घरमहाराष्ट्रशिंदे गटाच्या ४० आमदारांना सोबत घेऊन २८८ मतदारसंघात काढणार सावरकर गौरव यात्रा...

शिंदे गटाच्या ४० आमदारांना सोबत घेऊन २८८ मतदारसंघात काढणार सावरकर गौरव यात्रा – चंद्रशेखर बावनकुळे

Subscribe

मुंबईः २८८ मतदारसंघातून सावरकर गौरव यात्र निघणार आहे. भाजपचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यात्रेत सहाभागी होणार आहेत. शिंदे यांच्यासोबत असलेले ४० आमदारही यात्रेत असतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिली.

चंद्रशेखर बावनुकळे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः एक यात्रा काढणार आहे. भाजपचे सर्व आमदार आणि खासदार त्यांच्या मतदारसंघात यात्रा काढतील. भाजपच्या बुथ प्रमुखापासून सर्वच कार्यकर्ते व पदाधिकारी यात्रेत सहभागी होणार आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व आणि पश्चिम विदर्भ, कोकण अशा सर्व विभागात तेथील प्रमुखांना यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.

- Advertisement -

सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान या देशातील १३० कोटी जनता कधीच विसरणार नाही. सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. राहुल गांधी एक दिवस तरी कारागृहात राहू शकतात का, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.

सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिला आणि महाराष्ट्रात आरोपप्रत्यारोप सुरु झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उभयंतांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याचेही जाहिर केले.

- Advertisement -

मी राहुल गांधी यांचा धिक्कार करतो. जनतेमध्ये या प्रकरणी तीव्र असंतोष आहे’ असे सांगत “शिवसेना आणि भाजपा मिळून संपूर्ण राज्यभर सावरकर गौरव यात्रा आयोजित करत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सावरकर यांच्या त्यागासाठी आणि देशभक्तीसाठी राज्यभरात, प्रत्येक जिल्ह्यात, विधानसभा क्षेत्रात ही यात्रा आम्ही नेणार आहोत. राहुल गांधी यांनी सावरकरांचा जो वारंवार अपमान केला आहे, त्याचा आम्ही या यात्रेतून निषेध करू”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सोमवारी ही पत्रकार परिषद झाली आणि मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी या गौरव यात्रेच्या नियोजनाची माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -