घर ताज्या घडामोडी महाराष्ट्र सदनात साजरी होणार सावरकरांची जयंती; मुख्यमंत्री शिंदे खासदारांसह करणार शक्तीप्रदर्शन

महाराष्ट्र सदनात साजरी होणार सावरकरांची जयंती; मुख्यमंत्री शिंदे खासदारांसह करणार शक्तीप्रदर्शन

Subscribe

यंदाच्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 140वी जयंती साजरी करण्यात येत आहे. यावर्षी पहिल्यांदाच ही जयंती नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात येणार आहे. या

राज्यभरात आज (ता. 28 मे) स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती (Swatantryaveer Savarkar Birth Anniversary) साजरी करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षापासून आजचा दिवस हा राज्य सरकार गौरव दिन म्हणून साजरा करणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षापासून सावरकरांची जयंती आणखी उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात देखील सावकरांच्या जयंती तयारी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सदनाला आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपस्थित राहणार आहेत.

यंदाच्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 140वी जयंती साजरी करण्यात येत आहे. यावर्षी पहिल्यांदाच ही जयंती नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत. या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा खास पुतळा महाराष्ट्र सदनात लावण्यात आला आहे. (Savarkar’s birth anniversary to be celebrated in Maharashtra Sadan; CM Eknath shinde will be present)

- Advertisement -

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात याआधी कधीही स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती साजरी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात येताच त्यांनी जातीने यामध्ये लक्ष घालत या वर्षी महाराष्ट्र सदनात जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. तर यंदाच्या वर्षापासून सावरकरांची जयंती हा दिवस गौरव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच त्यांच्याकडून करण्यात आलेली होती.

या जयंतीच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व खासदारांसह नवीन संसद भवनाच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ते सर्व खासदारांसहित एक प्रकारचे शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या पहिल्या टप्प्यानंतर नरेंद्र मोदी आणि भाजपच्या खासदारांनी जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जमून वीर सावरकरांना आदरांजली वाहिली. यावेळी खासदारांनी रांगेत येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या फोटोला पुष्प अर्पण केली.

- Advertisment -