Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश होम लोन झालं स्वस्त; एसबीआयची अशी आहे विशेष ऑफर

होम लोन झालं स्वस्त; एसबीआयची अशी आहे विशेष ऑफर

बेस रेट आणि कर्ज दरात 0.05 % ची कपात केली जाहीर, नवा दर 7.54 टक्क्यांवर, 15 सप्टेंबरपासून अंमलबजावणी

Related Story

- Advertisement -

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसबीआय (SBI)ने आपल्या ग्राहकांना बेस रेट आणि कर्जाचा व्याजदर कमी करत मोठी भेट दिलीय. बँकेने बेस रेट आणि कर्ज दर 0.05% ने कमी केले केल्याने एसबीआयचे होम लोन, व्हेईकल लोन, पर्सनल लोन आणि इतर कर्ज कमी होणार आहे. नवीन व्याजदर १५ सप्टेंबरपासून लागू होतील.

एसबीआयने जाहीर केलेल्या नव्या व्याजदरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील आर्थिक भार कमी होणार आहे. बेस रेटमध्ये कपात केल्यानंतर हा दर ७.५४ टक्क्यांवर आला आहे. तसेच, कर्जाचा दर ०.०५ टक्क्यांनी कमी होऊन १२.२० टक्क्यांवर आलाय.

अन्य बँकांनीही कमी केले दर

- Advertisement -

खासगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्रा बँकेने आपल्या व्याजदरात ०.१५ टक्के कपात केलीय. कपातीनंतर गृहकर्जाचा व्याजदर ६.६५ वरुन ६.५० टक्क्यांवर आलाय. एचडीएफसीच्या होम लोनचे व्याजदर ६.७५ टक्के (महिला ग्राहकांसाठी) आहेत. इतर सर्व ग्राहकांसाठी हे दर ६.८० टक्क्यांपासून सुरू होतात.

- Advertisement -