Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल : सहा याचिका अन् पाच न्यायाधीश

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल : सहा याचिका अन् पाच न्यायाधीश

Subscribe

 

मुंबईः गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार गेले. भाजपने या आमदारांना साथ दिली. अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयात एकापोठापाठ एक अशा सहा याचिका दाखल झाल्या. या सहा याचिकांवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली.

- Advertisement -

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर या सहा याचिकांवर मार्च महिन्यात दैनंदिन सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला. या घटनापीठातील न्या. एम. आर. शाह हे १५ मे रोजी म्हणजेच येत्या सोमवारी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्याआधीच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल येईल हे स्पष्ट होते. समलिंगी विवाहाला मान्यता द्यावी की नाही या मुद्यावर सुनावणी सुरु असताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उद्या खूप काम आहे. आम्ही निकाल देणार आहोत, असे वक्तव्य केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच येणार अशी चर्चा सुरु झाली. अखेर न्यायालयाच्या कामकाजाचा बोर्ड संध्याकाळी प्रसिद्ध झाला. त्यात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या सकाळी साडेदहा वाजता दिला जाईल असे नमूद होते. त्यामुळे उद्याच निकाल दिला जाईल हे स्पष्ट झाले.

 

- Advertisement -

या आहेत सहा याचिका

पहिली याचिका ठाकरे गटाचे आमदार सुभाष देसाई यांची आहे. या याचिकेत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रधान सचिव यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

दुसरी याचिका मुख्यमंत्री एकनाथ संभाजीराव शिंदे यांची आहे. या याचिकेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

तिसरी याचिका शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केली आहे. या याचिकेतही विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

चौथी याचिका ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे. या याचिकेत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रधान सचिव यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

पाचवी याचिका ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचीच आहे. या याचिकेत विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व अन्य यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

सहावी याचिकाही ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचीच आहे. या याचिकेत विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

 

पाच न्यायाधीशांचे घटनापीठ

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शाह, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली, न्या. पी. आर. नरसिम्हा

- Advertisment -