घरमहाराष्ट्रहसन मुश्रीफ कुटूंबीयांचे शेकडो कोटींचे घोटाळे; सोमय्यांचा मनी लॉंड्रिंगचा गंभीर आरोप

हसन मुश्रीफ कुटूंबीयांचे शेकडो कोटींचे घोटाळे; सोमय्यांचा मनी लॉंड्रिंगचा गंभीर आरोप

Subscribe

गेल्या काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा भाजप नेते किरिट सोमय्या यांनी दिला होता. हा इशारा दिल्यानंतर त्यांनी ११ नेत्यांनी नावे देखील समोर आणली होती. यानंतर सोमय्यांनी आज सोमवारी, राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करत पुरावा असल्याचा दावा देखील सादर केला. महाआघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपा नेते माजी खासदार किरिट सोमय्या यांनी केला आहे. हसन मुश्रीफ कुटूंबीयांने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. त्याचे पुरावे मी आयकर विभागाला सादर केले आहेत. सीआरएम सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडमधून हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी दोन कोटींचं कर्ज घेतले असल्याचे दाखवले असून सीआरएम सिस्टीम मधून कर्ज घेणाऱ्यांवर कारवाई सुरु झाली आहे. नाविद मुश्रीफच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात याचा उल्लेख असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाकरे सरकारमधील डर्टी इलेव्हन

ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनची नावं मी जाहीर केली होती, असे सोमय्यांनी म्हणत प्रताप सरनाईक, अनिल देशमुख , अनिल परब, भावना गवळी, महापौर किशोरीताई पेडणेकर, जितेंद्र आव्हाड, रविंद्र वायकर, छगन भुजबळ , यशवंत जाधव, यामिनि जाधव, मिलिंद नार्वेकर यांची नावे त्यांनी याआधी घेतली होती. त्यात आता राखीव खेळाडू म्हणून हसन मुश्रीफ यांचेही नाव वाढवले असे ते म्हणाले. मुश्रीफांनी शेकडो कोटींचा घोटाळा, बोगस कंपन्या, त्यांच्या नावे मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. या संदर्भात त्यांनी २७ पानांचा पुरावा आपल्याकडे असल्याचा दावाही किरिट सोमय्या यांनी केला आहे.

- Advertisement -

मुश्रीफांच्या मुलावर सोमय्यांचा आरोप

बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी २ कोटीचे कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल\बोगस कंपनी आहे. नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, २ कोटीहून जास्त रक्कम दाखवली असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

पुढे सोमय्यांनी असेही म्हटले की, बाप बेटे दोघांच्या १२७ कोटींचे पुरावे आमच्याकडे आहेत. हसन मुश्रीफ यांनी पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याचे ३ लाख रुपयांचे शेअर्स दाखवले आहे. २०१८-१९ मध्ये इन्कम टॅक्सने मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. यावेळी बेनामी १२७ कोटींचे व्यवहार समोर आले आहेत. उद्या मी मुंबई इडीकडे अधिकृत तक्रार करणार आहे. २७०० पानांचे पुरावे देणार आहे. माझ्याकडे दोन मंत्र्यांच्या फाइल तयार होत्या. एक राष्ट्रवादी एक शिवसेनेच्या. आता राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा घोटाळा उघडकीस आणला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांचे घोटाळे लवकरच बाहेर काढू असे किरीट सोमय्या म्हणाले.


किरीट सोमय्यांविरोधात दोन आठवड्यात १०० कोटींचा दावा ठोकणार – हसन मुश्रीफ
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -