घरमहाराष्ट्रकंत्राटी भरतीतून आरक्षणाला सुरुंग लावण्याचा डाव; सुजात आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल

कंत्राटी भरतीतून आरक्षणाला सुरुंग लावण्याचा डाव; सुजात आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल

Subscribe

सांगली : राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारचा सरकारी आस्थापनांमध्ये विविध पदांसाठी कंत्राटी कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी 9 खाजगी एजन्सींची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी क्षेत्रातील एससी, एसटी, ओबीसीचे आरक्षण संपवायचे आहे. असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला. या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले होते. (Scheme to tunnel reservation through contractual recruitment Sujat Ambedkar attacked the government)

मोर्चाला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, जो कंत्राटीचा जीआर काढला आहे हे खासगीकरणासाठीच पाहिलं पाऊल आहे. यांना आपल्या अंगणवाड्या, सरकारी दवाखाने बंद पाडायचे आहेत. दलित, बहुजन, मुसलमानांना, वंचित समूहांच्या प्रगती करण्याचा मार्ग बंद करायचा आहे. त्यांची खेळी लक्षात घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. मनुवादी, ब्राह्मणवादी, अर्ध्या चड्डीवाले, धारकरी एका बाजूला बसलेले आहेत. त्यांनी एक व्यवस्था बनवली आहे, एक खोली तयार केली आहे. पण त्या खोलीमध्ये जेव्हा वंचित समाजातला व्यक्ती जायचा प्रयत्न करतो तेव्हा हे दार बंद करून घेतात.

- Advertisement -

हेही वाचा – गुत्तेदारांच्या फायद्यासाठी नागपूरच्या विकासाचे सोंग; ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं. प्रगतीचा एक रस्ता दाखवला आहे. पण ब्राह्मण्यवादी तुम्हाला या व्यवस्थेत घेत नसले तरी आम्ही त्यात घुसून दाखवणार. त्यांनी दारं उघडली नाही तर, आम्ही लाथ मारून ते दार उघडणार आहोत. दार तोडण्याची वेळ येईपर्यंत, तिथे पोहचण्याचा रस्ता बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी सरकारवर केली. कंत्राटीचा जीआर काढून खासगीकरणाचा करण्याच त्यांचा प्रयत्न पहिलं पाऊल आहे, त्यांचा पुढचा हल्ला हा आरक्षणावर असणार आहे, असा सूचक इशारा त्यांनी उपस्थितांना दिला. स्पर्धा परिक्षांमध्ये आरक्षण असत, परंतु जर आता कंत्राटी पद्धतीने काम होऊ लागली आणि काम मिळू लागली, तर हे लोक कंत्राट भरतीमध्ये आरक्षण लावतील का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा – पराभवाच्या भितीपोटी नैराश्येतून नरेंद्र मोदींची काँग्रेसवर पातळी सोडून टीका; नाना पटोलेंचा पलटवार

इथल्या दलित, आदिवासी, मुस्लिम, सर्व वंचित समाजातील तरुण आहेत. जे शिक्षण घेऊन बाबासाहेबांच्या मार्गावर चालतात. त्या सर्वांना या व्यवस्थेतून बाहेर पाडण्याचा हा डाव आहे. त्यासाठी त्यांनी ही कंत्राटीकरणाची व्यवस्था चालू केली आहे. जनतेने त्यांना एक संदेश दिला पाहिजे, तुम्ही ही कंत्राटी व्यवस्था लावा आणि प्रयत्न करा पण, येत्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला सत्तेच्या बाहेर फेकून टाकू असा वक्तव्य त्यांनी या मोर्चाला संबोधित करतांना केले. या मोर्चास वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुखे, संतोष सूर्यवंशी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -