घरमहाराष्ट्र'अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरुन शिष्यवृत्ती द्या'

‘अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरुन शिष्यवृत्ती द्या’

Subscribe

ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरुन शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचे समाज कल्याण आयुक्तांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचे निर्देश

कोरोना विषाणुचा प्रादुर्भव लक्षात घेता राज्यात अनके महिन्यांपासून शाळा, कॉलजेस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्याना शाळा महाविद्यालयाच्या नियमानुसार ७५ टक्के हजर राहणे शक्य नव्हते. त्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी देखील अडचण निर्माण झाली होती. मात्र यावर आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरुन मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ देण्याचे आदेश धनंजय मुंडेंनी दिले आहेत. राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणास आर्थिक सहाय्य मिळावे या दृष्टीने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या विविध योजना सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविल्या जातात. परंतु कोरोनामुळे राज्यातील बहुतांश महाविद्यालयात डिजिटल पद्धतीने शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून यावर्षीच्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचे निर्देश समाज कल्याण आयुक्तांना देण्यात आले आहेत.

- Advertisement -

२०२०- २०२१ या काळात विद्यार्थांना ७५% उपस्थित राहणे शक्य न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशाची प्रत मुंडेनी आपल्या ट्विटरवर देखील पोस्ट केली आहे. त्यामुळे सन 2020-21 या वर्षांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता, शिष्यवृत्ती फ्री शीप, देशांतर्गत शिष्यवृत्ती, विद्यावेतन व इतर शिष्यवृत्ती योजनांच्या लाभाकरीता विद्यार्थांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरत पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -