राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय; ‘या’ मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. दरवर्षी २५ मुलामुलींना शिष्यवृत्ती देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Scholarships will be given to students of Kandal Forest and Marine Biodiversity
कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. दरवर्षी २५ मुलामुलींना शिष्यवृत्ती देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोबतच काही महत्त्वाचे निर्णयदेखील यावेळी घेण्यात आले.
( Scholarships will be given for higher studies abroad in the field of Kandal Forest and Marine Biodiversity shinde Fadnavis Government )

  • कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. दरवर्षी २५ मुलामुलींना ही शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
  • घनकचरा संकलनासाठी आयसीटी आधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य दिले जाणार आहे. तसचं, सर्व शहरांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे.

( हेही वाचा: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज? बैठकीबाबत कोणीही सांगितले नसल्याची माहिती )

  • महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होण्यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  • तसचं, शिरोळ तालुक्यात ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालयदेखील उभारण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
  • करमणूक शुल्क आकारणीमध्ये सुट देण्याचा निर्णयदेखील या बैठकीत घेण्यात आला आहे.