घरमहाराष्ट्रयंदा १३ जूनपासून शाळेची घंटा वाजणार, शिक्षण विभागाने जाहीर केले वेळापत्रक

यंदा १३ जूनपासून शाळेची घंटा वाजणार, शिक्षण विभागाने जाहीर केले वेळापत्रक

Subscribe

 शालेय शिक्षण विभागाने याबाबत एक परिपत्रक काढले आहे.  या परिपत्रकानुसार, या वर्षी शाळा २३७ दिवस सुरू राहणार आहेत. शाळेचे पहिले सत्र आॅक्टोबरपर्यंत असणार आहे. तर दुसरे सत्र ९ नोव्हेंबरला सुरू होणार आहे.

उन्हाळ्याची सुट्टी पडलेल्या मुलांना आता सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कमीच दिवस उरले आहेत. कारण आता शाळा सुरू होण्याची तारीख शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. यानुसार राज्यातील शाळा १३ जूनपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू होण्याच्या तारखेची घोषणा होण्यासह राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २०२२ -२३ या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रकही घोषित केले आहे.

शालेय शिक्षण विभागाने याबाबत एक परिपत्रक काढले आहे.  या परिपत्रकानुसार, या वर्षी शाळा २३७ दिवस सुरू राहणार आहेत. शाळेचे पहिले सत्र आॅक्टोबरपर्यंत असणार आहे. तर दुसरे सत्र ९ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. सुट्ट्यांच्या बाबतीत मात्र यंदा शिक्षक आणि विद्यार्थ्यांची चंगळ असणार आहे. या वर्षी २० अतिरिक्त सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत. तसेच दिवाळीच्या २६, उन्हाळ्यामध्ये ३६ आणि अतिरिक्त ४ अशा ७६ मिळणार आहेत. यामध्ये रविवारच्या ५२ सुट्ट्यांचा समावेश केलेला नाही. म्हणजे यंदा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकूण १२८ सुट्ट्या मिळणार आहेत.

- Advertisement -

परभणी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका स्मिता काळे म्हणाल्या, सरकारने जाहीर केलेले वेळापत्रक शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. गेल्या चार-पाच वर्षांपासून सरकारचा हा वार्षिक उपक्रम आहे. नियोजन आमच्यासाठी उपयुक्त ठरते. तर पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सतीश भोंग म्हणाले, शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाच्या आधारे पालक त्यांच्या पाल्यासाठी सुट्ट्यांचे नियोजन करू शकतात. शिक्षकांनाही आराम करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. वेळापत्रक अगोदरच जाहीर केल्याने त्यांना सुद्धा त्यांच्या कुटुंबासोबत बाहेर जाण्याचे नियोजन करता येते. कोविडच्या उद्रेकामुळे दोन कठीण वर्षानंतर शैक्षणिक वर्ष नियमित केल्याने पुढचे वर्ष आव्हानात्मक दिसते.

शाळांचे वार्षिक वेळापत्रक मार्च २०२० पासूनच्या कोरोना लाॅकडाऊनपासून बिघडले आहे. मागील वर्षीच्या जूनपासून शाळा आॅनलाईन सुरू झाल्या. त्यानंतर आॅक्टोबरपासून आॅफलाईन शाळा सुरू झाल्या. यंदा शाळा सुरळीत सुरू राहतील अशी अपेक्षा आहे. मुलेही युनिफाॅर्मध्ये दिसतील आणि तासही नियमीत सुरू होतील. यंदाच्या शैक्षणिक वर्षात आठड्यातील तासांची संख्या ४५ वरून ४८ करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -