अँटीबॉडीजमधून होणार आता गोवरचा खात्मा? मुंबईतील ‘या’ रुग्णालयाचा संशोधनासाठी पुढाकार

search for measles anitbodies now priority given to woman in nair hospital

राज्यात कोरोना महामारीची उद्रेक कमी होत नाही तोवर गोवर या संसर्गजन्य आजाराने डोकं वर काढलं. विशेषत: मुंबई, ठाण्यात गोवरने थैमान घातले आहे. यात लहान मुलांना गोवरची सर्वाधिक लागण झाल्याचे दिसले. गोवर आजारावर लस उपलब्ध असतानाही प्रार्दुभाव का वाढला? त्याची लागण कशी झाली? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आता मुंबईतील नायर हॉस्पिटल सर्वेक्षणातून करणार आहे.

आत्तापर्यंत नवजात अर्भकाला मातेकडूनच गोवरविरोधातील अँटीबॉडीज मिळतात. त्यामुळे नवजात बाळाच्या जन्मानंतर नऊ महिन्यांनी गोवरचा पहिला तर 15 व्या महिन्यात दुसरा डोस दिला जातो. मात्र अचानक उद्भवलेल्या गोवरच्या साथीने दहशत निर्माण केली आहे. या पार्श्वभूमीवर 23 ते 37 वयोगटातील महिलांचे सर्वेक्षण करुन गोवरविरोधात अँटीबॉडीज सापडतात का? याचा शोध घेतला जाणार आहे. यासाठी नायर हॉस्पिटलच्या जनऔषध वैद्यशास्त्र विभागात तयारी सुरु केली जाणार आहे. या अभ्यास एम ईस्ट वॉर्डात केला जाईल.

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मातेकडून नवजात अर्भकाला गोवर अँटीबॉडीज मिळतात का? संबंधित वयोगटातील महिलांच्या शरीरात अँटीबॉडीज आहेत का? पालक मुलांना गोवरची लस देण्यास नकार का देतात? गोवरविरोधात लस देण्यासाठी पालकांना कोणत्या गोष्टी प्रवृत्त करतात? असा अनेक प्रश्नांचा शोध घेतला जाणार आहे.

या सर्वेक्षणात महिलांच्या शरीरात गोवरविरोधात लढण्याचा अँटीबॉडीज आहेत किंवा नाहीत, याचा तपास केला जाईल? काही विशेष आढळल्यास आरोग्य धोरणात आवश्यक बदल केले जातील, अशी माहिती नायर हॉस्पीटलचे जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख ऋजुता हाडये यांनी दिली आहे.


विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी ‘या’ दोन दिवशी जाणार संपावर