Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र शोध बेपत्ता मुलींचा : किशोरवयात प्रेमात पडणे अयोग्य, वाचा काय म्हणताय जाणकार

शोध बेपत्ता मुलींचा : किशोरवयात प्रेमात पडणे अयोग्य, वाचा काय म्हणताय जाणकार

Subscribe

नाशिक : किशोरवयात प्रेमात पडणे अयोग्य असते. प्रेमासारखी पवित्र आणि चांगली गोष्टी दुसरी नाही. परंतु, योग्य वेळी, योग्य गोष्ट केलेली बरी असते. किशोरवयात एकमेकांबद्दल आकर्षण वाटणे हा हार्मोन्सचा प्रभाव असतो. किशोरवयातील प्रेमाचे स्थान जीवनात कायम ठेवायचे असेल तर मोठे व्हा, करिअर घडवा, शरीर सदृढ बनवा, असा मोलाचा सल्ला संमोहन तज्ज्ञ शैलेंद्र गायकवाड यांनी ‘माय महानगर’शी बोलताना दिला.

गायकवाड पुढे म्हणाले की, आठवी, नववीपासून मुलेमुलीपासून बायफ्रेंड व गर्लफ्रेंड हवा, अशा पद्धतीच्या नात्यांमध्ये पडतात. त्यातून दोघेजण लग्न करून संसारही सुरू करतात. मात्र, काही दिवसांनी त्यांच्यातील प्रेम संपुष्टात येते. तो खूप समजून घेतो. ऐकून घेतो. आई-वडील समजून घेत नाहीत. जेव्हा आपण ट्रेंडला बळी पडतो. आपण आपले आयुष्य जगतो की इतर कोणी सूचवलेले आयुष्य जगत आहोत, याचा विचार करावा.

- Advertisement -

स्वत:चे आयुष्य म्हणजे नैसर्गिक आवेग चांगल्या पद्धतीने कायम ठेवणे असते. ज्यामधून कधीही दु:ख वाट्याला येत नाही त्याचबरोबर आपली अभिरूची जपून त्याचा आनंद घेणे, आयुष्य स्वत:सह इतरांच्या सर्व जबाबदार्‍या सन्माननीय पद्धतीने पेलणारे असावे. जगात नवनवीन ट्रेंड येतात. आमच्या काळात बॅगी, प्यारेलाल पॅन्ट वापरायचे. ट्रेंड हे बदल म्हणून येत असतात. ट्रेंड हे मनोरंजनासह आयुष्य नवीन काहीतरी बदल हवा म्हणून येतात. ट्रेंड याचा अर्थ कल किंवा फॅशन आहे. आमच्या काळात शिक्षणात डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सीएचे ट्रेंड होते. पूर्वी इंजिनिअरींगमध्ये सहा ट्रेंड होते. आता ३०० ब्रँचेस आहेत.

ज्यावेळेस स्वत:चे आयुष्य जगणे बंद करून ट्रेंडला बळी पडतो. त्यावेळी ग्राहक बनलो जातो. अशा ट्रेंडची आपल्याला किंमत चुकवावी लागते. त्यामध्ये वेळ, पैसा, श्रम, नाती, प्रतिष्ठा, जीवाची किंमत मोजावी लागते. आमच्या काळात वयात येणारी मुलेमुली प्रेमात पडायचे. एकमेकांबद्दल आकर्षण वाटायचे. त्या प्रेमाला मूर्त स्वरूप देण्याचे धाडस प्रत्येकामध्ये नव्हते. तशा सोयीसुद्धा नव्हत्या. आजूबाजूच्या संस्कारांचा पगडा तीव्र स्वरुपात होता. मात्र, आजच्या काळात आठवीपासून मुलेमुली बॉयफ्रेंड व गर्लफ्रेंड हवी, अशी पद्धतीच्या नात्यांमध्ये पडत आहेत. पूर्वीच्या काळातील प्रेमामध्ये पडण्याचा ट्रेंड चित्रपटानुसार असायचे. ते पाहून आपलीच प्रेमकहाणी आहे, असे अनेकांना वाटायचे. आता चित्रपट, वेबसिरीज, रिल्स आहेत. त्या अनुषंगाने कॅफे हाऊस, हॉटेल्स आहेत. या ठिकाणी तरुणाई प्रेम व्यक्त करते.

- Advertisement -

प्रेम करताना बंडखोरी करत जोडीदार बनतात. प्रियकर, प्रेसयीचे नवरा-बायको बनता. काही दिवसांनी प्रेम अटते. प्रेमाने पोट भरत नाही, हे सत्य आहे. दहावीमध्ये ९० हून अधिक गुण मिळवलेल्या मुली गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली. दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अल्पवयीन असल्याने पोलीस समुपदेशानासाठी संपर्क साधला. तो मुलगा माझे ऐकतो, तो समजून घेतो, तो वेळ देतो, असे मुलीने समुपदेशामध्ये सांगितले.

दंतचिकित्सक तरुणी मद्यपी तरुणासोबत पळून गेली होती. त्याच्याकडे काहीच नसल्याने तिला वास्तवाची जाणीव झाली. तोपर्यंत उशीर झाला होता. तिने आईवडिलांशी संपर्क साधत परत घेऊन येण्यास सांगितले. तिची भावनिक गुंतवणूक झाल्याने तिला समुपदेशनाचा आधार घ्यावा लागला. अशा प्रकरणातून अनेक मुलामुलींच्या आयुष्याची वाताहत होतेे. किशोरवयात मुलामुलींमध्ये गोंधळ असतो. याबाबत पालकांनी जागृत असणे गरजेचे आहे. पालकांनी मुलामुलींशी मनमोकळेपणे संवाद साधला पाहिजे. आठवीतील मुलास गर्लफ्रेंड नसेल तर त्याला लूजर म्हटले जाते. त्यातून तो चीडचिड व निराशी राहू लागतो. ही बाब पालकांनी ओळखून मुलामुलींशी बोलले पाहिजे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलगा किंवा मुलगी कोणाशी बोलते ते समजत नाही. मुलेमुली पालकांना कळू न देता सोशल मीडियावर बोलत असतात. मात्र, ते धोकादायक आहे. मेकॅनिकल कोर्स केलेला मुलगा किंवा मुलींचा आयटी क्षेत्रात जाण्याचा कल वाढला आहे. दुसरा किंवा शेजारचा मुलगा आयटी इंजिनिअर व भरमसाठ पगार आहे म्हणून पालक त्यास आयटी इंजिनिअर होण्यास भाग पाडतात.  पंचतारांकित शाळांमधील मुलेमुलींचे पालक महागड्या गाड्या घेवून येतात. एका मुलाचे पालक महागडी गाडी घेवून येत नाहीत म्हणून त्या मुलाला लाज वाटायची. त्यामुळे त्याने वडिलांना महागडी गाडी घेण्यास भाग पाडले. त्यातून मुलाची शैक्षणिक गुणवत्ता खालावली. नवीन ट्रेंडनुसार लग्न संस्थेत प्री-वेडिंग शुटींग केली जातेे. अनेक कॅमेरेमन प्रणयाशी संबंधित फोटो शूट करत आहेत. लग्नानंतर सुरुवात झाल्यावर नवीन जोडप्यामध्ये वाद होतात. त्यातून दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला पण प्री-वेडिंग फोटोशूट व व्हिडीओमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

इतरांच्या सांगण्यानुसार आयुष्य घडवू नये

प्रत्येक ट्रेंड गरजेचे नसतात. नातेसंबंध सुमधुर व्हावेत. करियर चांगले व्हावे. मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उत्तम असावे. स्वत:सह कुटुंबाची प्रतिष्ठा वाढावी. इतरांच्या आयुष्याशी उपयोगी पडावे, हे खरे आयुष्य आहे. इतरांच्या सांगण्यानुसार आयुष्य घडवू नये, असे शैलेंद्र गायकवाड यांनी सांगितले.

आभासी जगापासून दूर रहावे

नवीन पिढी ट्रेडिंगच्या नावाखाली वेळ वाया घालवू नये. नातेसंबंधामध्ये चुकीच्या मार्गाने जात आहे. बाजारू गोष्टीपासून दूर रहावे. शाश्वत व सन्मानाने आयुष्य कसे जगावे. आभासी जगापासून दूर रहावे. त्यास बळी पडू नये. मोबाईल दिला म्हणून इंजिनिअरींगच्या मुलाने आत्महत्याची केल्याची घटना घडली आहे. समाज प्रगत तंत्रज्ञानाने झाला असला तरी वैचारिक प्रगल्भता येणे गरजेची आहे,असे शैलेंद्र गायकवाड यांनी सांगितले.

- Advertisment -