घरमहाराष्ट्रकर्जमाफीची दुसरी यादी २८ फेब्रुवारीला होणार जाहीर

कर्जमाफीची दुसरी यादी २८ फेब्रुवारीला होणार जाहीर

Subscribe

६८ गावांमधील शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळाली आहे. जिल्हा बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांमधील ३४ लाख शेतकरी दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीस पात्र ठरले आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ३४ लाख शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यानुसार २४ फेब्रुवारीला १५ हजार ३५८ लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध केली. कर्जमाफीची दुसरी यादी २८ फेब्रुवारीला जाहीर केली जाणार आहे. या यादीत तब्बल ६९ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, पोर्टलवर लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. यामुळे याद्या प्रसिद्ध होण्यास विलंब होत आहे. याद्या अपलोड होतील त्यानूसार लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे, असे सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

राज्यातील जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांमधील ३४ लाख शेतकरी दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. यामध्ये १८ लाख शेतकरी जिल्हा बँकांमधील आहेत. सहकार विभागाने बँकांकडून दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे. राज्यातील केवळ ६८ गावांमधील शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तीन महिन्यांहून अधिकचा कालावधी लागणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisement -

लाभार्थी शंभर टक्के समाधानी

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांना, या योजनेचा लाभ घेताना काही त्रास झाला का? किती हेलपाटे मारावे लागले? किती कर्ज होते? कुठल्या पीकाला कर्ज घेतले होते? आधीच्या आणि आताच्या कर्जमुक्ती योजनेमध्ये काय फरक जाणवला? असे प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांना विचारले. त्यावर योजनेबाबत शंभर टक्के समाधानी असल्याची भावना अहमदनगर जिल्ह्यातील पोपट मुकटे यांनी व्यक्त करताना “मागील वेळेस पाच ते सहा वेळा चकरा माराव्या लागल्या. आता केवळ एका थम्बवरच काम झाले”, असे त्यांनी सांगितले.


हेही वाचा – कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! शेतकऱ्याचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -