घरताज्या घडामोडीSamruddhi Highway : 'अनेकांना ही केवळ घोषणा...', देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

Samruddhi Highway : ‘अनेकांना ही केवळ घोषणा…’, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

Subscribe

'हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आज आपण सुरू करत आहोत. तसेच, येत्या सहा ते आठ महिन्यात संपूर्ण महामार्ग सुरू करण्यात येईल. तिसरा टप्पा सुरू होईल तेव्हा तो थेट मुंबईपर्यंत जाईल', अशा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आज आपण सुरू करत आहोत. तसेच, येत्या सहा ते आठ महिन्यात संपूर्ण महामार्ग सुरू करण्यात येईल. तिसरा टप्पा सुरू होईल तेव्हा तो थेट मुंबईपर्यंत जाईल’, अशा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या लोकार्पणानंतर या कार्यक्रमातील उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. (Second Phase of Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Highway DCM Devendra Fadnavis Shirdi)

“हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आज आपण सुरू करत आहोत. तसेच, येत्या सहा ते आठ महिन्यात संपूर्ण महामार्ग सुरू करण्यात येईल. तिसरा टप्पा सुरू होईल तेव्हा तो थेट मुंबईपर्यंत जाईल. असा मला विश्वास आहे. खरं म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्ते विभागाचे मंत्री आणि एमएसआरडीसीचे अध्यक्ष होते, आणि मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी राज्याच्या विकास करायचा असेल तर, राज्याचा मागास भाग मुंबईशी आणि फोर्टशी जोडणं हे अत्यंत महत्त्वाचे होते, असे आम्ही स्वप्न पाहिले होते”, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

“ज्यावेळी आम्ही स्वप्न पाहिले होते, त्यावेळी अनेक लोकांना हे स्वप्न वाटायचं, अनेकांना ही केवळ घोषणा वाटायची, अनेकांना असे वाटायचं की हे आता सुरू करतील 10 वर्षांनी पूर्ण होईल. पण हे काम आम्ही रेकॉर्ड टाईममध्येच पूर्ण करून दाखवू, असा मला आणि एकनाथ शिंदे यांना विश्वास होता”, असे सांगत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला

शायरीतून विरोधकांवर फडणवीसांचा निशाणा

- Advertisement -

मी आणि एकनाथ शिंदे लोकांना सांगत होतो की, “अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, सबको मंजीलोंका शौक है और मुझे रस्ते बनाने का”, अशी शायरी म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर ता. इगतपुरी या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. या महामार्गामुळे नाशिक ते शिर्डी हे अंतर जलदरित्या कापता येणे शक्य होणार आहे.

‘असा’ आहे समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा

समृद्धी महामार्गावर ७ मोठे पूल, १८ छोटे पूल, वाहनांसाठी ३० भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग, ३ पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, ५६ टोल बूथ, ६ वे ब्रिज आदी सुविधांचा समावेश आहे. पॅकेज क्र ११,१२ आणि १३ चे इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचा खर्च ३२०० कोटी रुपये एवढा असून लांबी ८० कि मी आहे. या टप्याच्या उद्‌घाटनानंतर ७०१ कि.मी पैकी आता एकूण ६०० कि.मी लांबीचा समृध्दी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

या दुसऱ्या टप्यात सिन्नर येथील गोंदे इंटरचेंज येथून नाशिक, अहमदनगर, पुणे व त्या भागातील इतर गावांसाठी या महामार्गाचा उपयोग होईल. भरवीर इंटरचेजपासून घोटी (ता. इगतपुरी) हे अंदाजे 17 कि.मी अंतरावर आहे. या इंटरचेंजपासून नाशिक, ठाणे, मुंबई येथून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास जलद होईल. तसेच भरवीर ह्या इंटरचेजपासून एस.एम.बी.टी रुग्णालय अत्यंत जवळ (500 मीटर अंतरावर) आहे. शिर्डीपासून ह्या रुग्णालयापर्यंत एक तासाच्या आत पोहचता येईल. याशिवाय शिर्डी, अहमदनगर व सिन्नर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येण्यासाठी कमी कालावधी लागेल.


हेही वाचा – कामाची वेळ पाळा नाहीतर २०२४मध्ये मोदींचं सरकार येईल, केतकरांनी टोचले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -