घरमहाराष्ट्रदुसरी, 11 वीचा अभ्यासक्रम बदलणार

दुसरी, 11 वीचा अभ्यासक्रम बदलणार

Subscribe

शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून इयत्ता दुसरी आणि अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. नव्या अभ्यासक्रमामध्ये तोंडी, प्रकल्प परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनासाठी देण्यात येणारे गुण बंद होणार आहेत. प्रात्यक्षिके असलेले विषय वगळता सर्व विषयांची शंभर गुणांची परीक्षा होणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) आखलेल्या नियमानुसार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाची पुनर्रचना आणि नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाते. एनसीईआरटीने आखलेला अभ्यासक्रम देशातील सर्व शिक्षण मंडळांना बंधनकारक असतो.

- Advertisement -

एनसीईआरटीच्या नव्या निर्देशांनुसार राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी अभ्यासक्रम बदलण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार गतवर्षी दहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला होता. तर २०१९-२० शैक्षणिक वर्षात दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. त्यामुळे दुसरी व अकरावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलण्यात येणार आहेत. नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके अधिकृत पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्थाना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

त्याचप्रमाणे 2020-21 पासून तिसरी व बारावीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. त्यामुळे 2019-20 हे शैक्षणिक वर्ष तिसरी व बारावीच्या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष असणार आहे. पुढील वर्षी तिसरी व बारावीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -