घरमहाराष्ट्रलोकांचा रोष दाबण्यासाठी पूरग्रस्त भागात जमावबंदी; सरकार म्हणजे जनरल डायर

लोकांचा रोष दाबण्यासाठी पूरग्रस्त भागात जमावबंदी; सरकार म्हणजे जनरल डायर

Subscribe

एकीकडे शेतकऱ्यांना ‘ऐ तू गप्प बस’ अशा धमक्या आणि दुसरीकडे पुरग्रस्त भागातील जनतेचा रोष दाबण्यासाठी भाजपाने जमावबंदीचा आदेश काढला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. हे सरकार जनरल डायरचं सरकार आहे का? असा संतप्त सवाल करतानाच अशा जनरल डायर सरकारला घाबरुन न जाता त्यांना उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी भाजपा सरकारचा समाचार घेतला.

'हे जनरल डायरचे सरकार आहे का?' नवाब मलिक यांचा सरकारला सवाल…

'हे जनरल डायरचे सरकार आहे का?' Nawab Malik यांचा सरकारला सवाल… जनतेचा रोष दाबण्यासाठी सरकारचा पूरग्रस्त भागात जमावबंदीचा आदेश… एकीकडे शेतकऱ्यांना 'ऐ तू गप्प बस' अशा धमक्या आणि दुसरीकडे पुरग्रस्त भागातील जनतेचा रोष दाबण्यासाठी भाजपाने जमावबंदीचा आदेश काढला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. हे सरकार जनरल डायरचं सरकार आहे का? असा संतप्त सवाल करतानाच अशा जनरल डायर सरकारला घाबरुन न जाता त्यांना उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी भाजपा सरकारचा समाचार घेतला.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुलमंत्री Chandrakant Patil हे शेतकऱ्यांना दमदाटी करत आहेत तर दुसरीकडे सरकारने पूरग्रस्त भागात १२ ते २४ ऑगस्ट दरम्यान जमावबंदी आदेश निर्गमित केला आहे. सरकारच्या या हुकुमशाही पद्धतीवर नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांना अशी दमदाटी करा किंवा जमावबंदी आदेश काढा, आम्ही घाबरणार नाही. उलट जनताच याचं उत्तर द्यायला तयार आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.#MaharashtraFloods #SangliFlood #kolhapurFlood BJP Maharashtra CMOMaharashtra

Nationalist Congress Party – NCP ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 12, 2019

- Advertisement -

 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुलमंत्री चंद्रकांत पाटील हे शेतकऱ्यांना दमदाटी करत आहेत, तर दुसरीकडे सरकारने पूरग्रस्त भागात १२ ते २४ ऑगस्ट दरम्यान जमावबंदी आदेश निर्गमित केला आहे. सरकारच्या या हुकुमशाही पद्धतीवर नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांना अशी दमदाटी करा किंवा जमावबंदी आदेश काढा, आम्ही घाबरणार नाही. उलट जनताच याचं उत्तर द्यायला तयार आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शिरोळमध्ये पुरग्रस्तांशी संवाद साधत होते. यावेळी पुरग्रस्तांनी काही प्रश्न विचारले. प्रश्न विचारताच चंद्रकांत पाटील त्या इसमावर चांगलेच संतापले. ए गप्प बस, असे म्हणत त्यांनी प्रश्न विचारणाऱ्याला शांत बसवले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून विरोधकांनी टीका करण्याची ही आयतीच संधी चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांनी पुरग्रस्तांना भरला दम

तक्रारी करुन काहीही होणार नाही… चंद्रकांत पाटील यांची पुरग्रस्तांना दमबाजी

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 12, 2019

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -