घरताज्या घडामोडीमुंबईत कलम 144 लागू, कोणत्या गोष्टी सुरू आणि बंद राहणार?

मुंबईत कलम 144 लागू, कोणत्या गोष्टी सुरू आणि बंद राहणार?

Subscribe

मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. या व्यतिरिक्त जाहीर सभा घेण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या कलमांर्गत संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांकडून आदेश जारी करण्यात आले असून येत्या 4 डिसेंबर ते 3 जानेवारी 2023पर्यंत संपूर्ण राज्यात कलम 144 लागू राहणार आहे.

या कालावधीत शहरात शस्त्रं, फायर आर्म्स, तलवारी आणि इतर शस्त्रं बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. एवढंच नाही तर यावेळी घोषणाबाजी, निदर्शनं आणि सार्वजनिक ठिकाणी गाणी सादर करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. शैक्षणिक उपक्रमांसाठी शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांमध्ये होणाऱ्या बैठकांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

- Advertisement -

कोणत्या गोष्टी राहणार बंद?

– सार्वजनिक ठिकाणांभोवती मोठ्या प्रमाणात सामाजिक मेळावे घेण्यास मनाई.

- Advertisement -

– 5 पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई.

– फटाके फोडणे, लाऊडस्पीकर, वाद्ये आणि बँड वाजवण्यावर बंदी

– सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी, निदर्शने करण्यास बंदी.

– मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यास बंदी

– सर्व प्रकारच्या मिरवणुकांवर बंदी.

– बंदुक, तलवारी आणि इतर शस्त्रांना परवानगी नाही.

– धरणे/उपोषणावर बंदी.

– दुकानं, आस्थापना किंवा व्यवसाय-संबंधित बैठका आणि मेळाव्यावर बंदी.

कोणत्या गोष्टींना परवानगी?

– सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये

– कंपन्या, क्लब, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संघटनांच्या कायदेशीर बैठका.

– शैक्षणिक उपक्रमांसाठी शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा आसपास संमेलने.

दरम्यान, CrPC अंतर्गत कलम 144 लागू करण्याचा उद्देश म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता समाजात शांतता व सुव्यवस्था राखणं हा आहे. राज्याची परिस्थिती पाहून डीएम किंवा जिल्हाधिकारी कलम 144 लागू करण्यासाठी अधिसूचना जारी करतात.


हेही वाचा : ‘हा’ विषय संपवावा लागेल, उदयनराजेंनी राज्यपालांच्या घेतलेल्या भूमिकेवरून पाटलांनी जोडले


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -