ठाण्यात संरक्षण भिंत कोसळून एक जण जखमी; पाचपाखडी येथील घटना

या घटनेत भगवान मस्के(५२) यांच्या पायाला दुखापत झाली. तर, उर्वरित भिंतीचा भाग धोकादायक स्थितीमध्ये आहे.

पाचपखाडी, सर्विस रोड येथील पारेख गॅरेजच्या मागील अहिरे चाळीची अंदाजे ३० फूट लांबी व ५ फूट उंची सुरक्षा भिंत चारचाकीवर पडल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत भगवान मस्के(५२) यांच्या पायाला दुखापत झाली. तर, उर्वरित भिंतीचा भाग धोकादायक स्थितीमध्ये आहे. (Security wall collapse in thane pachpakhadi)

हेही वाचा – कुर्ला इमारती दुघर्टनेतील मृतांचा आकडा 19 वर, राज्य सरकारकडून मृतांना 5 लाखांची आर्थिक मदत

तसेच पडलेल्या भिंतीचा मलबा रस्त्याच्या एका बाजूला केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, उथळसर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एकाला दुखापत झाली आहे. तर या महिन्यात मुलुंड टोलनाकाच्या अगोदर असलेल्या मॉडेला कंपनीची अंदाजे ५०-फूट लांबीची संरक्षक भिंत कोसळून दोन महिला जखमी झाल्या होत्या.

हेही वाचा कुर्ला इमारतीकडून पालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष ; वेळीच मोठी दुरुस्ती न केल्याने दुर्घटना

दरम्यान, काल कुर्ल्यात झालेल्या दुर्घटनेत १९ जणांना जीव गमवावा लागला आहे. चार मजली दोन इमारती कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली होती.

हेही वाचा – कळव्यात इमारतीचे स्लॅब कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण