घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपद्मश्री राहीबाईंनी बनवली चंद्र्कांत पाटलांसाठी बीज राखी

पद्मश्री राहीबाईंनी बनवली चंद्र्कांत पाटलांसाठी बीज राखी

Subscribe

अकोले : सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊ राया रे वेड्या बहिणीची रे वेडी माया, या मराठी गीताला शोभेल असे पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी भाऊ चंद्रकांतदादा पाटील यांच्यासाठी बीज राखी बनवली आहे. त्यांनी ती राखी भावास दिली.
भात, नागली, वरई, काकडी, भोपळा यासारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी या राख्या स्वतःच्या हाताने तयार केली आहे. चंद्रकांतदादा पाटील यांना बंधू मानलेल्या पद्मश्री राहीबाई यांनी आजपर्यंत बीज बँकेच्या रूपाने महाराष्ट्रातील हजारो शेतकर्‍यांना आपल्या विशेष प्रेमाने व आदराने भाऊ बनवून घेतले आहे. राहीबाई यांच्या प्रेमापोटी हजारो शेतकरी त्यांना आपली बहीण मानतात. या शेतकर्‍यांच्या प्रेमापोटी त्यांनी या बीज राख्यांची निर्मिती केली आहे. चंद्रकांतदादा पाटील हे राहीबाई यांना आपल्या भगिनी मानतात. भावांसाठी त्यांनी बीज राख्यांची विशेष मोहीम राबवली आहे. तसेच, त्यांनी जवानांसाठी राख्या बनवल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -