घरताज्या घडामोडीपुण्याच्या सिनोत सिसोलेकर याची बालशक्ती पुरस्कार २०२१ साठी निवड

पुण्याच्या सिनोत सिसोलेकर याची बालशक्ती पुरस्कार २०२१ साठी निवड

Subscribe

बालशक्ती पुरस्कार २०२१ साठी पुण्याच्या सिनोत सिसोलेकर याची निवड करण्यात आली आहे

शैक्षणिक क्षेत्रामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुणे येथील सिनोत सिसोलेकर या बालकाची ‘बालशक्ती पुरस्कार २०२१’ साठी निवड झाली आहे. त्याने नासा सीआयएस आंतरराष्ट्रीय २०१९ची स्पर्धा जिंकली. ज्वालामुखी या विषयात सर्वोत्कृष्ट विज्ञान पुरस्काराने तो सन्मानित असून, ‘वन फॅमिली वन टेलीस्कोप’ आंतरराष्ट्रीय स्पर्धाही त्याने जिंकली.

उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पदक

केंद्रीय महिला व बाल विकास विभागाकडून ५ ते १८ वयोगटातील बालकांना शैक्षणिक, क्रीडा कला व संस्कृती, सामाजिक कार्य शैार्य व नाविण्यपूर्ण या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पदक व रोख १ लाख रुपये या स्वरूपात पंतप्रधान बालक पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारा अंतर्गत बालशक्ती पुरस्कार २०२१ व बाल कल्याण पुरस्कार २०२१ साठी केंद्रीय महिला व बाल विकास विभागाने ऑनलाईन अर्ज मागविले होते. बालशक्ती पुरस्कार २०२१ साठी पुणे जिल्ह्यातून एकूण १७ बालकांचे अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले होते. या सर्व १७ अर्जांची पुण्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून छाननी करण्यात आली. अर्जांमधील महितीच्या व निकषांप्रमाणे १३ बालकांचे अर्ज पात्र आढळून आले. पात्र १३ अर्ज ‘बालशक्ती पुरस्कार २०२१’ साठी जिल्हाधिकारी पुणे यांच्या शिफारसीने केंद्र शासनाकडे सादर करण्यात आले. या १३ अर्जांमधून केंद्र शासनाकडून सिनोत सिसोलेकर या बालकाची ‘बालशक्ती पुरस्कारा’साठी निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सिनोत सिसोलेकर याचा पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार केला.

- Advertisement -

सिनोत सिसोलेकरसह वेगवेगळया राज्यांतून बालशक्ती पुरस्कारासाठी निवड झालेल्या पुरस्कार्थींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पुणे जिह्यातील पुरस्कार्थी बालकांचे आई-वडील, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे आदी उपस्थित होते.


हेही वाचा – तुमचं रेशनकार्ड ‘आधार’ला लिंक आहे का! अन्यथा मोफत रेशन बंद

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -