स्वत्व जागवणारा प्रसंग; नौदलाच्या नवीन ध्वजासाठी बावनकुळेंकडून मोदींचे कौतुक

महाराष्ट्राची मान उंच झाली, शान वाढली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी कोचीमध्ये नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण केले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांच्या हस्ते भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत(INS vikrant) ही युद्धनौका दाखल झाली आहे. या सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(pm naredra modi)  हस्ते भारतीय नौदलाच्या नवीन ध्वजाचेही अनावरण करण्यात आले. भारतीय नौदल आता अखेर ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाले आहे. भारतीय नौदलावरची (indian navy) ब्रिटिशांची ओळख आता पूर्णपणे पुसली गेली आहे. कारण भारतीय नौदलाच्या नवीन ध्वजात आता तिरंग्यासोबतच छत्रपती शिवाजी शिवजी महाराजांच्या राजमुद्रेच्या आराकातील नवीन चिन्ह देण्यात आले आहे. नौदलाचा नवा ध्वज छत्रपती श्री शिवाजी महाराजांना अर्पण करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील ही अलौकिक घटना प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रतेजाचे स्फुलिंग चेतविणारी आहे. स्वत्व जागवणारा आणि देशाभिमानाचे रोमांच उभे करणारा हा प्रसंग आहे.

हे ही वाचा –  पारतंत्र्याची आणखी एक निशाणी आज पुसली गेली; नौदलाच्या नवीन ध्वजासाठी फडणवीसांकडून मोदींचे कौतुक

माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. महाराष्ट्राची(maharahstra) मान उंच झाली, शान वाढली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी कोचीमध्ये नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण केले. हा नवा ध्वज भारतीय आरमाराचे जनक छत्रपती श्री शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे. या नव्या ध्वजामधून ब्रिटीशांच्या सर्व खुणा काढण्यात आल्या. आता या ध्वजावर भारतीय छाप आहे.

हे ही वाचा – हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवा, दसरा मेळाव्यासाठी मनसैनिकांची राज ठाकरेंना साद

आजची ही घटना आपल्या गुलामगिरीच्या सर्व खुणा पुसणारी आहे. भारतीयत्वाच्या भावनेने ओतप्रोत हा नवा ध्वज आम्हाला आत्मबल देईन. शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. त्या तेजाला मानाचा मुजरा. अशा शब्दांत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भावना व्यक्त केल्या.

हे ही वाचा –  शिंदे फडणवीस सरकार म्हणजे ‘इव्हेंटबाज’ ईडीचे सरकार; सुप्रिया सुळेंनी साधला निशाणा

Edited By – Nidhi Pednekar