Homeक्राइमप्रजासत्ताकदिनी वन परीक्षेत्र कार्यालयासमोर आत्मदहन; वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनमजुराने केला आत्मदहनाचा प्रयत्न

प्रजासत्ताकदिनी वन परीक्षेत्र कार्यालयासमोर आत्मदहन; वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनमजुराने केला आत्मदहनाचा प्रयत्न

Subscribe

वनमजूर राजेंद्र काळू साळुंके यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून प्रजासत्ताक दिनी रविवारी (दि.२६) ताहाराबाद येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यात ते ६० टक्के भाजले असून, त्यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आत्मदहन करण्याचा इशारा देऊनही वनविभाग व पोलीस प्रशासनाने दखल न घेतल्याने त्यांनी पेटवून घेतल्याचे समोर आले आहे.

ताहाराबाद वनपरीक्षेत्रा अंतर्गत येणार्‍या साल्हेर परीमंडळातील परशुराम नगर या फॉरेस्ट चेक नाक्यावर कार्यरत असलेले वनमजूर राजेंद्र काळू साळुंखे गेल्या आठ महिन्यांपासून विनावेतन काम करत आहेत. ते वेतन मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत होते. त्यांनी २६ जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. ते वनविभागात १९९२ पासून मानधन तत्वावर कार्यरत आहेत. साळुंखे यांनी रविवारी ताहाराबाद वन विभागाच्या कार्यालयाबाहेर स्वतःवर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेतले. त्यात ते 60 टक्के भाजले असून, त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
असे आहे.

वनविभागाचे स्पष्टीकरण

राजेंद्र साळुंके यांनी ३ जानेवारी २०२५ रोजी वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय, ताहाराबाद प्रादेशिक येथे थकीत वेतन मिळण्यासाठी आत्मदहनाबाबत निवेदन दिले होते. त्यांचे वेतन १७ जानेवारी २०२५ रोजी अदा करण्यात आले आहे. साळुंके यांना आत्मदहन करू नये, याबाबत वनपरीक्षेत्र अधिकारी ताहाराबाद प्रादेशिक यांनी त्यांचे थकीत वेतन अदा करून त्यांना आत्मदहनापासून परावृत्त केले होते. याप्रकरणी जायखेडा पोलीस व तहसीलदारांना २३ जानेवारी २०२५ रोजी पत्रानुसार माहिती देण्यात आली होती, असे वनविभागाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

चौकशी समिती गठीत

वनमजूर साळुंके यांनी आत्मदहनाचा प्रयत्न का केला, याबाबत चौकशी उपवनसंरक्षक, पूर्व भाग, नाशिक यांनी तात्काळ चौकशी समिती गठीत केली आहे. समिताचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मालेगाव प्रादेशिक पूर्व विभागाचे सहायक वनसंरक्षक शेखर तनपुरे यांनी प्रसिद्धपत्रकाव्दारे दिली.