घरमहाराष्ट्रहिंदुत्वावरून पुन्हा एकदा सेना-भाजप आमनेसामने, आता संजय राऊत म्हणतात...

हिंदुत्वावरून पुन्हा एकदा सेना-भाजप आमनेसामने, आता संजय राऊत म्हणतात…

Subscribe

शिवरायांना उद्ध्वस्त करण्यासाठी दिल्लीतून आक्रमणं झाली. काहींची बोटं छाटली गेली. औरंगजेबदेखील स्वराज्याविरोधात महाराष्ट्रात आला होता. मात्र, त्यालाही येथेच मृत्यू पत्करावा लागला. शिवचरित्रातील हा महत्त्वाचा धडा शिवसेनेच्या शत्रूंनी कायम लक्षात ठेवावा. महाराष्ट्रावर चालून येणाऱ्यांची बोटं छाटली जातील, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय.

मुंबईः भाजपवाले कधीपासून हिंदू झालेत हे पाहावं लागेल, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपला टोला लगावलाय. आमचं हिंदुत्व कातडीचं आहे आणि शिवसेनेचं हिंदुत्व सालीचं असल्याची टीका भाजपवाल्यांनी केली होती. त्यालाच आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

शिवरायांना उद्ध्वस्त करण्यासाठी दिल्लीतून आक्रमणं झाली. काहींची बोटं छाटली गेली. औरंगजेबदेखील स्वराज्याविरोधात महाराष्ट्रात आला होता. मात्र, त्यालाही येथेच मृत्यू पत्करावा लागला. शिवचरित्रातील हा महत्त्वाचा धडा शिवसेनेच्या शत्रूंनी कायम लक्षात ठेवावा. महाराष्ट्रावर चालून येणाऱ्यांची बोटं छाटली जातील, असा इशाराही संजय राऊतांनी दिलाय. भाजपचे हिंदुत्व हे कातडीसारखं आहे, तर शिवसेनेचे हिंदुत्व शालीसारखं असल्याचे वक्तव्य भाजप नेत्यांनी केले होते. त्याचवरून संजय राऊतांनी पलटवार केलाय. गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वावरून शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या विचारातून, प्रेरणेतून शिवसेनेची स्थापना केली. आज जो भगवा फडकत आहे, सर्वांना जे भगव्याचं प्रेम अचानक उफाळून आलंय, त्याचे प्रेरक आधी शिवाजी महाराज होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे होते. त्यामुळे कुणाला वाटत असेल दिल्लीच्या तख्ताचा वापर करून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील नेत्यांना झुकवायला लावू. त्यांनी परत एकदा आजचा अग्रलेख वाचला पाहिजे. शिवचरित्रंही त्यांनी वाचलं पाहिजे, असा टोलाही संजय राऊतांनी लगावलाय.

विशेष म्हणजे संजय राऊतांनी मनसेलाही टोला लगावलाय. कुणी काय करत असेल तर हा आपापल्या बुद्धीचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत जन्म घेतला हे महत्त्वाचं आहे. महाराज या मातीत जन्माला आले म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. बाकी इतर प्रांतांना भूगोल आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने ज्यांना राजकारण करायचं त्यांनी ते करावं. महाराजांचं व्यक्तिमत्व थोर आणि महान आहे. त्यांनी संपूर्ण देशाला दिशा दिली आहे, असंसुद्धा संजय राऊतांनी सांगितलंय.

- Advertisement -

हेही वाचाः काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, म्हणाले…

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -