घरताज्या घडामोडीकधीही निवडून न आलेले संजय राऊत पक्ष संपवायला निघालेत, दीपक केसरकरांचे पत्र

कधीही निवडून न आलेले संजय राऊत पक्ष संपवायला निघालेत, दीपक केसरकरांचे पत्र

Subscribe

जे कधीही जनतेतून निवडून आले नाहीत, ते संजय राऊत पक्ष संपवायला निघाले आहेत. संजय राऊत हे शरद पवारांच्या गळ्यातील ताईत आहेत. भाजपपासून तुम्ही शिवसेना कदाचित दूर नेऊ शकाल. पण, शिवसेना जर हिंदुत्त्वापासून दूर नेणार असाल तर ते आम्ही कसे खपवून घेऊ? असा प्रश्न बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी विचारला आहे. त्यांनी आज एक पत्र प्रसिद्ध केलं असून त्यात त्यांनी त्यांची खदखद व्यक्त केली आहे. (Sena rebel mla Deepak Kesarkar Wrote a letter to Shivsainik)

हेही वाचा -ज्यांचा आत्मा मेलाय त्यांच्याकडून निष्ठेची काय अपेक्षा ठेवणार? संजय राऊतांचा बंडखोरांवर पुन्हा हल्ला

- Advertisement -

दीपक केसरकर म्हणाले की, दुर्दैव म्हणजे संजय राऊतांचे ऐकून पक्ष चालणार असेल आणि आमच्यासारख्या अनेकवेळा जनतेतून निवडून येणाऱ्या आमदारांना दूर डकलेल जाणार असेल तर करायचे तरी काय? उद्धवजी आणि आमच्यात दरी वाढवण्याचे पाप संजय राऊतांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी बंदूक चालवायची, खांदा संजय राऊतांचा वापरायचा आणि त्यातून मारले जाणार कोण तर पक्षाचे शत्रू नव्हे तर आपणच. हे आम्हाला मान्य नाही. म्हणूनच हा लढा शिवसेनेचा आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा आहे, शिवसेनेच्या अस्तित्वाचा आहे, मराठी आणि हिंदुत्त्वाच्या अस्मितेचा आहे. हे बंड नाही, हा शिवसेनेच्या अस्तित्वाचा आहे आणि तो जिंकल्याशिवाय आता माघार नाही.

हेही वाचा – पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांना ईडीचे समन्स, उद्या हजर राहावे लागणार

- Advertisement -

दीपक केसरकर यांच्या पत्रातील दहा महत्त्वाचे मुद्द

    1. अख्खा पक्ष शरद पवारांच्या दावणीला बांधायाचा असेल तर शिवसेनेचे अस्तित्व काय?
    2. कधीही निवडून न आलेले संजय राऊत पक्ष संपवायला निघाले आहेत.
    3. उद्धवजी आणि आमच्यात दरी वाढवण्याचं पाप संजय राऊतांनी केले.
    4. आमचा लढा शिवसेनेचा आहे, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा आहे, शिवसेनेच्या अस्तित्वाचा आहे, मराठी आणि हिंदुत्वाच्या अस्मितेचा आहे. हे बंड नाही, हा शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा आहे आणि तो जिंकल्याशिवाय आता माघार नाही
    5. शिवसेनेचे आणि आमचे पक्षनेते उद्धव साहेबांनी आमच्या आग्रहाचा विचार करावा आणि आघाडीऐवजी भाजपसोबत युती करावी.
    6. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातून भाजप तर वाढत होतीच, पण शिवसेनासुद्धा आपली ताकद आणखी वाढवण्याचा प्रयत्न सातत्याने करीतच होती.
    7. सर्व महत्त्वाची खाती काँग्रेस, राष्ट्रवादीला देऊन टाकायची आणि मुख्यमंत्रीपद तेवढे ठेवायचे. दाऊदशी संबंध असल्याचा आरोप झालेल्या मंत्र्याचा बचाव तरी कसा करायचा.
    8. देशातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा देशातील अन्य विरोधी पक्ष सुद्धा जी भाषा वापरत नाही, ती भाषा आमच्या संजय राऊतांच्या तोंडी कायम असते.
    9. युती, आघाड्या यापेक्षाही आपला आक्रमक हिंदूत्व बाणा, ही बाळासाहेबांची आम्हाला पहिली आणि अंतिम शिकवण आहे आणि यापुढेही तीच आजन्म राहील. आमचा जन्म असोकी मृत्यू हिंदूत्वाची चादर पांघरूनचच होईल.
    10. शिवसेनेचे अस्तित्वच राहणार नसेल तर मिळणारी पदं, सत्ता काय कामाची?

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -