पुणे – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून खासदार गिरीश बापट आजारी आहेत. असे असतानाही त्यांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या काळात प्रचारसभेत आले होते. नाकात नळी, बोटाला ऑक्सिमीटर लावून त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं होतं. प्रकृती नाजूक असतानाही त्यांनी प्रचार सभेत हजेरी लावल्याने सर्वांनी त्यांच्या उत्साहाचं कौतुक केलं होतं. परंतु, त्यानंतर लागलीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्या आलं होतं. यावेळी सर्वपक्षीय अनेक नेत्यांनी गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांच्या आरोग्यासाठी सदिच्छा दिल्या होत्या.
BJP MP Girish Bapat’s has been admitted to Deenanath Mangeshkar hospital. He is critically ill and is currently on life support treatment: Deenanath Mangeshkar Hospital pic.twitter.com/3OXoUmRQow
— ANI (@ANI) March 29, 2023
दरम्यान, आता त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अतिदक्षता विभागात व्हेटिंलेटवर ठेवण्यात आले आहे. रुग्णालयाकडून दुपारी दोन वाजता पुन्हा मेडिकल बुलेटीन जाहीर होणार आहे. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीविषयी अधिकची माहिती मिळू शकेल.