घरताज्या घडामोडीज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड सुंदर नवलकर यांचं निधन

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड सुंदर नवलकर यांचं निधन

Subscribe

नवलकर यांच्या जाण्याने कम्युनिस्ट चळवळीची मोठी कधीही न भरुण येणारी हानी झाली आहे.

ज्येष्ठ सीपीआय नेत्या कॉम्रेड सुंदर नवलकर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं असून त्या १०० वर्षांच्या होत्या. नवलकर कम्युनिस्ट चळवळीच्या अत्यंत कर्मठ, लढाऊ नेत्या अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी वयाच्या शंभराव्या वर्षी वृद्धापकाळानं मुंबईत अखेरचा श्वास घेतला आहे. विद्यार्थ्यांसाठी अनेक वर्ष त्यांनी चळवळ चालवली होती. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या म्हणूनही त्या परिचित होत्या. त्यांच्या जाण्याने कधीही न भरणारी हानी झाली आहे. सुंदरा नवलकर या निष्णात वकील होत्या त्यांनी न्यायालयात आणि न्यायालयाबाहेर अशा अनेक लढाया त्यांनी लढल्या आहेत. नवलकर यांच्या जाण्याने कम्युनिस्ट चळवळीची मोठी कधीही न भरुण येणारी हानी झाली आहे.

महाराष्ट्रात झालेल्या डाव्या चळवळींमध्ये नवलकर यांनी मोठे योगदान दिले आहे. तसेच त्यांनी हजारो कामगारांचे संघटन आपल्या लढाऊ वृत्तीच्या जोरावर केले होते. कधीही न भरुन निघणारी हानी आहे. अशा प्रकारची व्यक्ती पुन्हा जन्माला येईल अशी शक्यता नाही. असे राजकीय विश्लेषक कुमार केतकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले आहे.

- Advertisement -

त्या कट्टर कम्युनिस्ट होत्या विचाराने परंतु १९६४ साली पक्ष फुटल्यानंतर आणि विशेषता दुसरा पक्षत सीपीएम पक्ष फुटल्यानंतर त्या माओवाद्यांकडे गेल्या आणि त्या शेवटपर्यंत अत्यंत लढाऊ, कामगारांच्या बाजूने लढणाऱ्या उत्तम वकील होत्या. कामागारांच्या बाजून लढणाऱ्या होत्या त्यांची जिद्द, व्यक्तिमत्त्व विलक्षण होती की त्यांच्या वैचारिकदृष्ट्या कट्टर क्षत्रू असला तरी त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायचा असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्या अविवाहित होत्या परंतु कधीही कोणत्या लोभाला मोहाला शरण जायच्या नाहीत. सत्तेचे त्यांना काही आकर्षण नव्हते. त्यांचे वय जरी १०० असले तरी अनेक तरुण मुलांच्या त्या स्टडी सर्कल आणि बौद्धिक वर्ग घ्यायच्या यासाठी अनेक तरुण यायचे. नवलकर यांना इतिहास, मार्क्सवाद,स्टॅलिन, एकूण जगाचा इतिहास या विषयांचा अभ्यास होता. कोणत्याही राजकारणाचे क्षेत्र असे नव्हते की ज्याच्याबाबत त्यांचा अभ्यास नव्हता असेही राजकीय विश्लेषक कुमार केतकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -