ज्येष्ठ सिने पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचे निधन

Senior entertainment journalist and writer Lalita Tamhane passes away
ज्येष्ठ सिने पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचे निधन

ज्येष्ठ सिने पत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचं दीर्घ आजारांमुळे निधन झाले आहे. त्या ६० वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे विधीज्ञ विनीत रणदिवे आणि मुलगी सोनल आणि तीन बहिणी हा परिवार आहे. लोकसत्ताच्या लोकमुद्रा पुरवणीचे त्यांनी संपादन केले होते. मृदू, लाघवी स्वभावाच्या ललिता बाईंनी सिनेपत्रकारितेला गॉसिप पासून दूर ठेवून वास्तव आणि सत्याचा पुरस्कार त्यांनी आपल्या बातम्यांत केला.

त्यांचे अनेक अभिनेत्रींबरोबर मैत्री आणि स्नेहाचे संबंध होते. नूतन, स्मिता पाटील, माधुरी दिक्षीत, रेणुका शहाणे, रेखा, दीप्ती नवल, मृणाल कुलकर्णी, प्रिया तेंडुलकर, प्रतीक्षा लोणकर आदींचा उल्लेख करावाच लागेल. त्यांनी ‘स्मिता, स्मित, मी’, ‘नूतन असेन मी.. नसेन मी’, ”तें’ ची प्रिया’ ही ललिता ताम्हणे यांची पुस्तके रसिकांना आवडली होती. या पुस्तकांच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. त्यांनी ‘उजळल्या दाही दिशा’, ‘झाले मोकळे आकाश’ या दोन कादंबऱ्या लिहिल्या होत्या. सध्या त्या दीप्ती नवलचं चरित्र लिहीत होत्या.