ज्येष्ठ उद्योगपती पालनजी मिस्त्री यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन, टाटा समूहाशी होते जिव्हाळ्याचे संबंध

शापूरजी पालनजी ग्रुप हा भारतातील सर्वात मोठा व्यवसाय समूह आहे. हा गट अभियांत्रिकी ते बांधकाम, पायाभूत सुविधा रिअल इस्टेट, पाणी, ऊर्जा, वित्तीय सेवा यासह अनेक क्षेत्रात कार्यरत आहे.

नवी दिल्ली : शापूरजी पालनजी समूहाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती पालनजी मिस्त्री यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. कंपनीच्या अधिकृत निवेदनानुसार, पालनजी मिस्त्री यांचे दक्षिण मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी मध्यरात्री निधन झाले. वर्ष 2016 मध्ये पालनजी मिस्त्री यांना भारताचा मुख्य नागरी सन्मान पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पालनजी मिस्त्री यांचा जन्म मुंबईत गुजरातमधील पारशी कुटुंबात झाला.

कंपनी अनेक क्षेत्रात कार्यरत

शापूरजी पालनजी ग्रुप हा भारतातील सर्वात मोठा व्यवसाय समूह आहे. हा गट अभियांत्रिकी ते बांधकाम, पायाभूत सुविधा रिअल इस्टेट, पाणी, ऊर्जा, वित्तीय सेवा यासह अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. या गटात 50,000 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. हा गट 50 देशांमध्ये एंड टू एंड सोल्यूशन्स प्रदान करतो.

टाटा समूहातील भागीदारी

टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये पालनजी कुटुंबाचा सुमारे १८.४ टक्के हिस्सा होता. शापूरजी पालनजी ग्रुपची स्थापना १८६५ साली झाली. शापूरजी पालनजी ग्रुपने मुंबईत अनेक इमारती बांधल्या आहेत, यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ताजमहाल पॅलेस बिल्डिंग यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी शापूरजी पालनजी समूहाने आपला ग्राहकोपयोगी वस्तूंचा व्यवसाय अमेरिकन प्रायव्हेट इक्विटीला विकला आणि अॅडव्हेंट इंटरनॅशनलला निधी दिला.

सायरस मिस्त्री यांच्याशी काय संबंध?

पालनजी मिस्त्री हे सायरस मिस्त्री यांचे वडील आहेत. पालनजी मिस्त्री आणि त्यांचे कुटुंब 2012 मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले, जेव्हा त्यांचा धाकटा मुलगा सायरस मिस्त्री यांच्याकडे टाटा समूहाचे नेतृत्व सोपवण्यात आले. रतन टाटा यांच्या निवृत्तीनंतर डिसेंबर २०१२ मध्ये ते टाटा समूहाचे अध्यक्ष बनले. मात्र, २०१६ मध्ये त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सायरस मिस्त्री यांच्यातही याबाबत बराच वाद झाला होता.


हेही वाचाः एकनाथ शिंदे आज मुंबईत येणार? महाविकास आघाडी सरकारची अग्निपरीक्षा