घरताज्या घडामोडीराज्यात वरीष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; सातारा-सोलापूरला मिळाले नवे अधीक्षक!

राज्यात वरीष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; सातारा-सोलापूरला मिळाले नवे अधीक्षक!

Subscribe

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या मुद्द्यांवरून विरोधक सातत्याने टीका करत असताना राज्य सरकार मात्र एकापाठोपाठ बदल्यांचे आदेश काढत आहेत. गेल्याच आठवड्यात राज्य सरकारने एकूण ४२ वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. आता पुन्हा एकदा ६ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. यामद्ये सातारा, सोलापूर, रायगड, जळगावला नवे पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. बदली करण्यात आलेल्या ६ पोलीस अधिकाऱ्यांपैकी ४ अधिकाऱ्यांना बदली ठिकाण देण्यात आले असून २ अधिकाऱ्यांना अजूनही त्यांच्या पोस्टिंगसंदर्भात माहिती देण्यात आलेली नाही. ती स्वतंत्र आदेशान्वये सांगण्यात येईल, असं राज्य सरकारच्या गृहविभागाने जारी केलेल्या शासन आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

बदली करण्यात आलेले अधिकारी

१. अशोक दुधे – रायगडच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली.
२. अजय कुमार बन्सल – साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली.
३. तेजस्वी सातपुते – साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदावरून सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली.
४. कुमार चिंथा – अंमळनेर उपविभागातून जळगाव उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली.
५. अनिल पारस्कर – रायगड पोलीस अधीक्षक पदावरून बदली करण्यात आली. बदलीचे ठिकाण स्वतंत्र आदेशाने कळवण्यात येणार.
६. निलभ रोहन – जळगाव उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक पदावरून बदली करण्यात आली. बदलीचे ठिकाण स्वतंत्र आदेशाने कळवण्यात येणार.


वाचा सविस्तर – राज्यात पोलीस बदल्यांना सहाव्यांदा मुदतवाढ; वरिष्ठ IPS अधकाऱ्यांच्या बदल्या!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -