Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे राज्यातील वरीष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणे पोलीस दलात मोठे फेरबदल!

राज्यातील वरीष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणे पोलीस दलात मोठे फेरबदल!

Related Story

- Advertisement -

राज्यातील IPS अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यात ठाणे पोलीस आयुक्तालयातील अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बदल्यांचे आदेश बुधवारी रात्री काढण्यात आलेले आहे. दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांची ठाणे पोलिसांच्या परिमंडळ ५ मध्ये बदली करण्यात आलेली असून परिमंडळ ५चे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांची परिमंडळ १मध्ये बदली करण्यात आलेली आहे. ठाणे विशेष शाखा १ मध्ये पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिमंडळ दोन च्या पोलिस उपायुक्त पदी योगेश चव्हाण, गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त पदी लक्ष्मीकांत देशमुख, आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त पदी सुनील लोखंडे, मुख्यालय एकच्या उपायुक्त पदी दत्ता कांबळे, मुख्यालय दोन च्या उपायुक्त पदी गणेश गावडे, परिमंडळ चार मध्ये प्रशांत मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी मुंबई विशेष शाखा एकच्या उपायुक्त पदी रुपाली अंबुरे, उपायुक्त मुख्यालय पदी अभिजीत शिवथरे यांची नियुक्ती करण्यात आली. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामध्ये अमित काळे यांची बदली परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी करण्यात आली आहे. परिमंडळ तीन मध्ये प्रशांत वाघुडे यांची बदली करण्यात आली. ठाणे ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षक पदी स्मिता पाटील, रत्नागिरीच्या अपर पोलिस अधीक्षक पदी जयश्री देसाई, वर्धाच्या अपर पोलिस अधीक्षक पदी यशवंत सोळंखी यांची नियुक्ती करण्यात आली. बालसिंग राजपूत यांची बदली मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली. विक्रम साळी यांना पोलीस उपायुक्त अमरावती, प्रशांत खैरे यांना पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नागपूर या पदावर नियुक्त करण्यात आले. सुभाष बुरसे यांची बदली गुप्त वार्ता विभाग मुंबईच्या पोलीस उपायुक्त पदी करण्यात आली. सचिन पांडकर यांना महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या पोलीस अधीक्षक पदी नेमण्यात आले. संदीप जाधव यांना विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर यांच्या कार्यालयात पोलीस अधीक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. संजय जाधव यांना गृहरक्षक दलाच्या अपर नियंत्रक पदी नियुक्त करण्यात आले. दिपक देवराज यांची बदली महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या पोलीस अधीक्षक पदी करण्यात आली. गीता चव्हाण यांना मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले व राजकुमार शिंदे यांना दहशतवाद विरोधी पथक (गुप्त वार्ता) च्या पोलिस अधीक्षक पदी नियुक्त करण्यात आले.

- Advertisement -

ips officer transfer

प्रसाद अक्कानवरु यांना राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त, रवींद्रसिंग परदेशी यांना राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त, निमित गोयल यांना मुंबईत पोलीस उपायुक्त, सारंग आव्हाड यांना नागपूर शहरात पोलीस उपायुक्त, बी.बी. पाटील यांना ठाणे शहरात पोलीस उपायुक्त वाहतूक या पदावर नियुक्त करण्यात आले. तुषार दोशी यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ येथील प्राचार्य पदावरुन मुंबई पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आलेली बदली रद्द करण्यात आली.

- Advertisement -