घरताज्या घडामोडीपाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? - दिलीप वळसे...

पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? – दिलीप वळसे पाटील

Subscribe

पाकळ्या मिटून घेण्याचे हे नवे ऑपरेशन कमळ म्हणावे का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत भाजपला चांगलेच डिवचले आहे.

मुंबई : पाकळ्या मिटून घेण्याचे हे नवे ऑपरेशन कमळ म्हणावे का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत भाजपला चांगलेच डिवचले आहे. शिवाय, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही विधान परिषद निवडणुकीत सत्यजित तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही, असे विधान केले. तसेच, सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांचा बंडखोर असाही उल्लेख नाना पटोले यांनी केला. (Senior NCP leader and former Home Minister Dilip Valse Patil criticizes BJP)

भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार उभा केला नाही तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांच्यासाठी माघार घेतली त्यामुळे या निवडणुकीत नवीन ट्वीस्ट आल्याचे पहायला मिळाले. दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म कुणालाही दिला नाही किंवा अधिकृत उमेदवारही घोषित केला नाही असे ट्वीटमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

नेमके प्रकरण काय?

विधान परिषद निवडणुकीत भाजपविरोधात एकजुटीने उमेदवार देण्याचे निश्चित झाले असताना महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे गुरुवारी समोर आले. नाशिकमध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज न भरल्याने काँग्रेसचीच कोंडी झाली. येथील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीची घोषणा गुरुवारी सकाळी दिल्लीतून करण्यात आली, मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत डॉ. तांबे यांनी अर्ज सादर केला नाही. त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. अपक्ष अर्ज सादर करून सत्यजित तांबे यांनी एकप्रकारे काँग्रेसला सोडचिठ्ठीच दिली आहे.

- Advertisement -

नाना पटोले सत्यजित तांबेंवर आक्रमक

“आम्ही पक्षाकडून डॉ, सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. पण डॉ. सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरता एकप्रकारे पक्षासोबत फसवेगिरी केली. आपल्या मुलाचा अपक्ष फॉर्म भरून भाजपा पाठिंबा असल्याचे दर्शवले. कारण तांबे यांनी सांगितले की आम्ही भाजपाचा पाठिंबा घेणार हे एकप्रकारे काँग्रेसला धोका दिल्यासारखे आहे. त्यामुळे याबाबत हायकमांडला माहिती देण्यात आली आहे. आज यावर हायकमांड निर्णय घेणार असून, त्यांच्या निर्णयानंतर कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू. परंतु, बडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही”, असे नाना पटोले यांनी सांगितले.


हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड होणार, शासनाकडून 300 कोटींचा निधी उपलब्ध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -