ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची प्रकृती चिंताजनक

डॉ. प्रकाश आमटे यांची प्रकृती खराब झाल्याची माहिती समोर आली असून त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे

गेल्या काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांना रक्ताचा कर्करोग झाला असल्याचे निदान स्पष्ट झाले होते. त्यांच्या उपचारांची माहिती त्यांच्या मुलगा अनिकेत आमटे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती ठीक झाल्याने त्यांना हॉस्पिटलमधून तात्पूरता डिस्चार्ज सुद्धा मिळाला होता.

मात्र आता पुन्हा डॉ. प्रकाश आमटे यांची प्रकृती खराब झाल्याची माहिती समोर आली असून त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. २७ जून रोजी त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांची प्रकृती गंभीर असल्याने सर्व व्हिजीटर्सना प्रवेश बंद केलेला आहे. वेळोवेळी डॉक्टरांकडून अपडेट कळवले जातील अशी माहिती अनिकेत आमटे यांनी सांगितली आहे.

प्रकाश आमटे यांना उपचारासाठी पुण्यातील दिनेश मंगेशकर या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच प्रकाश आमटे यांना भेटण्यासाठी आलेल्या हितचिंतकांनी खाली ठेवलेल्या रजिस्टरवर आपल्या शुभेच्छा संदेश , नाव, नंबर लिहावा, मात्र भेटण्याचा आग्रह करू नये. असे अनिकेत आमटे यांनी सांगितले आहे.

मागील काही दिवसात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे हे बी. जे वैद्यकीय महाविद्यालयातील दीक्षांत समारंभासाठी डॉ. प्रकाश आमटे गेले होते. मात्र, तिथे त्यांनी अस्वस्थ वाटू लागलं. ताप आणि खोकला अशी लक्षणं आढळल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर न्युमोनियावर उपचार सुरू असतानाच काही चाचण्यांमधून त्यांना प्राथमिक अवस्थेतील रक्ताचा कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर त्यांची प्रकृती ठीक झाल्याने त्यांना हॉस्पिटलमधून तात्पूरता डिस्चार्ज सुद्धा मिळाला होता.