संपात सहभागी झाल्याने वरिष्ठ त्रास देतात, एसटी आगारात कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सचिन कदम असे या कर्मचाऱ्याचे नाव असून उल्हासनगरजवळील विठ्ठलवाडी एसटी डेपोमध्ये हा प्रकरा घडला. सचिन कदम या आगारात मॅकॅनिक म्हणून कार्यरत आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला असून कर्मचारी (ST Workers) कर्तव्यावर रुजू झाले आहेत. मात्र, संपात सहभागी घेतला होता म्हणून आता वरिष्ठ त्रास देत असल्याने एका एसटी कर्मचाऱ्याने एसटी डेपोमध्येच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सचिन कदम असे या कर्मचाऱ्याचे नाव असून उल्हासनगरजवळील विठ्ठलवाडी एसटी डेपोमध्ये हा प्रकरा घडला. सचिन कदम या आगारात मॅकॅनिक म्हणून कार्यरत आहेत. (Seniors are harassed for participated in a strike, an employee’s suicide attempt at an ST depot)

हेही वाचा – एसटीच्या ताफ्यात दाखल होणार 2 हजार इलेक्ट्रिक बस, परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा

सचिन कदम एसटी संपात सहभागी होते. यामुळे आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सचिन यांना त्रास दिला जात होता, असा आरोप करण्यात येत आहे. या त्रासाला कंटाळूनच सचिन यांनी प्रमाणापेक्षा जास्त झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येच्या चिठ्ठीत त्यांनी त्या अधिकाऱ्याचे नाव नमूद केले होते.

हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांसाठी जे जे शक्य ते करणार, उद्धव ठाकरेंचं आश्वासन

एसटी संपात सहभागी झालेल्या इतर कर्मचाऱ्यांनाही वरिष्ठांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. हा  मानसिक त्रास सहन न झाल्याने सचिन यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, असा दावा करण्यात येत आहे.

सचिन कदम यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्याचे इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच, त्यांच्या सहाकाऱ्यांनी त्यांना उल्हासनगरमधील रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण, कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात संप पुकारला होता. हा संप जवळपास पाच महिन्यांहून अधिक काळ राहिला. या काळात महाराष्ट्रातील प्रवाशांना अतोनात हाल सहन करावे लागले. तसेच, अनेक कर्मचाऱ्यांनाही आत्महत्या केल्या. अखेर, एसटी संप मागे घेतल्याने एसटी सेवा सुरळीत करण्यात आली आहे.