घरमहाराष्ट्रअनुप डांगेंच्या आणखी एका लेटर बॉम्बने खळबळ; संजय पांडेंना पत्र लिहीत म्हणाले...

अनुप डांगेंच्या आणखी एका लेटर बॉम्बने खळबळ; संजय पांडेंना पत्र लिहीत म्हणाले…

Subscribe

जितेंद्र नवलानी यांना दिलासा देताना त्यांच्याविरोधात मारहाण आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्हे रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत, यावरच आक्षेप घेत मुंबई पोलीस निरीक्षक अनुप डांगेंनी पोलीस आयुक्त संजय पांडेंना पत्र लिहित नवे आरोप केले आहेत.

मुंबई : पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी आणखी एक लेटर बॉम्ब टाकल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अनुप डांगे यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मुंबई पोलिसांनी आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी, असं नमूद केलं आहे.

अनुप डांगेंनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना लिहिलेल्या पत्रात काही अधिकाऱ्यांच्या नावांचाही उल्लेख केला आहे. जितेंद्र नवलानी यांना दिलासा देताना त्यांच्याविरोधात मारहाण आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्हे रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत, यावरच आक्षेप घेत मुंबई पोलीस निरीक्षक अनुप डांगेंनी पोलीस आयुक्त संजय पांडेंना पत्र लिहित नवे आरोप केले आहेत.

- Advertisement -

तसेच नवलानींविरोधात अधिकाऱ्यांनी मुद्दाम योग्य तपास केला नसल्याचा आरोप केला जात आहे. तपास अधिकारी पीआय किशोर शिंदे, त्यावेळचे एसीपी किरण काळे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने नवलानी विरोधात दाखल असलेला गावदेवी पोलीस ठाण्यातील गुन्हा रद्द केलाय. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊन पुन्हा योग्य तपास केला जावा, अशी मागणी अनुप डांगे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

विशेष म्हणजे 2019 मध्ये मुंबई पोलिसांनी जितेंद्र नवलानीच्या बारवर छापा टाकला, तेव्हा जितेंद्र नवलानी यांनी पोलिसांना त्यांचे काम करण्यापासून रोखले होते आणि त्याच आरोपावरून गावदेवी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता. तोच एफआयआर 12 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला होता. जितेंद्र नवलानी यांना फायदा व्हावा, यासाठी तपास अधिकार्‍यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि कायद्याने घालून दिलेले नियम जाणूनबुजून धुडकावून लावल्याचेही अनुप डांगे यांनी पत्रात नमूद केले आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे याआधीसुद्धा अनुप डांगेंनी पत्र लिहित तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एका पबवर कारवाई केली म्हणून आयुक्तांनी आपल्या विरोधात कारवाई केल्याचा आरोप अनुप डांगे यांनी केला होता. अनुप डांगे यांनी 2 फेब्रुवारीला याबाबतची लेखी तक्रार अपर मुख्य गृहसचिवांकडे केली होती. या दरम्यान परमबीर यांचे चुलत भाऊ असल्याचे सांगून शार्दुल बायास यांनी बदली थांबवण्यासाठी 50 लाखांची मागणी केली होती. पुढे निलंबन रद्द करून पुन्हा कामावर परत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे 2 कोटींची मागणी केल्याचा गंभीर आरोप ही अनुप डांगे यांनी केला होता. तसेच परमबीर सिंह यांचे थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचंही पत्रात नमूद केले होते.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -