घरCORONA UPDATECoronavirus : कोरोनाने मृत झालेल्यांना कब्रस्थानामध्ये वेगळी व्यवस्था!

Coronavirus : कोरोनाने मृत झालेल्यांना कब्रस्थानामध्ये वेगळी व्यवस्था!

Subscribe

कोरोनामुळे मृत पावलेल्या मुस्लिम समाजातील व्यक्तीसाठी कब्रस्थानांमध्ये अखेर वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे.

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, यामध्ये मृतांचा आकडा देखील वाढत आहेत. त्यातच दक्षिण मुंबईतील कोरोनाग्रस्त मुस्लिम मृत व्यक्तीला चंदनवाडी येथील बडा कब्रस्थान येथे दफन करण्यास मनसेने विरोध दर्शवला होता. मात्र, आता यावर राज्य सरकारने उपाय काढला असून, कोरोनामुळे मृत पावलेल्या मुस्लिम समाजातील व्यक्तीसाठी कब्रस्थानांमध्ये अखेर वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. ‘कोरोना’मुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या दफन व्यवस्थेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत नुकतीच रझा अकादमी या संघटनेच्यावतीने  बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या बैठकीमध्ये दफन व्यवस्थेसंदर्भात विविध मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली.  या बैठकीला हाजी अली व माहिम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवाणी, बाबा कब्रस्थानचे व्यवस्थापक शोएब खतीब, वक्फ बोर्ड ऑफ महाराष्ट्राचे डॉ. लांबे, जामा मस्जिदचे विश्वस्त हसीब किरकिरे, माहिम कब्रस्तानचे विश्वस्त इम्रान मुजफ्फर खान, साबिर निर्बन, अलहाज सहिद नुरी आदी उपस्थित होते.

बडा कब्रस्थान केंद्रबिंदु 

दरम्यान या बैठकीत मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्थान हे सर्व कब्रस्थानांचा केंद्रबिंदु असेल असे ठरवण्यात आले असून, दफन व्यवस्थेसंदर्भात सर्व प्रकारचे सहकार्य राज्य सरकार करेल असे अस्लम शेख यांनी सांगितले. तसेच दफनविधी व विशेष कार्य दलामधील स्वयंसेवकांच्या पगाराचा खर्चही सरकारच्या माध्यमातून उचलण्यात येणार आहे. यावेळी बडा कब्रस्तानचे शोएब खतीब यांनी मुंबई शहरामध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांसाठी बडा कब्रस्थानमध्ये वेगळ्या कबरी (थडगी) राखीव ठेवण्यात आल्याचे सांगितले. तसेच अन्य कब्रस्थानांमध्ये देखील अशीच व्यवस्था निर्माण करण्यात आली असून,  मुंबई बाहेरील शव एलबीएस कब्रस्तान येथे दफन केले जातील असे ते म्हणालेत. तर माहिम कब्रस्तानात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांसाठी पुढील २ दिवसांत अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

विशेष कार्यदलाची स्थापना 

कोरोनामुळे मृत पावणाऱ्या मुस्लिम समाजातील मृतांचा दफनविधी जलद व्हावा. यासाठी सुहैल खंडवानी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यदल स्थापन करण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान अल्लाहज सईद नूरी यांनी शब- ए -बारात च्या दिवसांमध्ये घरीच राहण्याचे, सर्व धार्मिक विधी घरीच करण्याचे व मस्जिद, कब्रस्थानांमध्ये जाण्यास मनाई असल्याने तेथे न जाण्याचे आवाहन मुस्लिम बांधवांना केले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

मुस्लिम बांधवांच्या मदतीसाठी हेल्पलाईन 

मुस्लिम बांधवाच्या मदतीसाठी मोबाईल नंबर देखील देण्यात आले आहेत.
अल्हाज सईद नूरी (जनरल सेक्रेटरी- रझा अकादमी) – 9821887860
शोएब खातीब (चेअरमन बडा कब्रस्तान)-  9833423342, 9833708378
साबिर निर्बान -9821030829
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -