घरदेश-विदेशसीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरीतील इमारतीला आग

सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरीतील इमारतीला आग

Subscribe

होरपळून पाचजणांचा मृत्यू * लस बनवण्याची जागा सुरक्षित

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीची निर्मिती करणार्‍या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली आहे. मांजरी परिसरातील गोपाळपट्टा भागात ही आग लागली आहे. मात्र, सुदैवाने कोव्हिशील्ड लस सुरक्षित आहे. ज्या इमारतीमध्ये लस निर्मितीचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी ही आग लागलेली नाही. कोव्हिशील्ड लस बनवली जात असलेली जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला गेट आहे, तिथे ही आग लागली आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीला कोणताही धोका नाही. मात्र या आगीत पाचजणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

कोव्हिशील्ड या लसीच्या निर्मितीचे काम हे गेट नंबर 3, 4 आणि 5 या परिसरात बनवली जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे. मांजरी परिसरात सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. यात इमारतीच्या दुसर्‍या मजल्याला ही आग लागली आहे. सुदैवाची बाब म्हणजे या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

कोरोना लसीच्या पुरवठ्यावर परिणाम नाही
कोरोना लसीची निर्मिती करणार्‍या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली आहे. दरम्यान लसीची निर्मिती ही सीरम इन्स्टिट्यूटच्या जुन्याच इमारतीत करण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती मिळत आहे.

विरोधकांना संयमाची लस आवश्यक -मुख्यमंत्री
सीरमचे प्रमुख अदर पूनावाला यांच्यासोबत माझे काही बोलणे झालेले नाही. मी प्रशासकीय यंत्रणेकडून माहिती घेतली. सर्व शांत झाल्यावर मी सगळ्यांशी संवाद साधणार आहे. कोणाला फोन करून त्रास दिलेला नाही. आग विझवण्याचे काम पूर्ण झालं की आपल्याला माहिती मिळेल. नुसते मी फोन करून काहीच होणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव यांनी पत्रकारांना सांगितले. उद्धव ठाकरेंना यावेळी विरोधक यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आहेत याबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले की, त्यांच्याकडे ही माहिती कशी येते? सर्जिकल स्ट्राइक वैगेरे इतर गोष्टी कशा कळतात हे गुपित आहे. त्यांचं ज्ञान अगाध आहे. काही विद्या वैगेरे प्राप्त असेल, माहिती असेल तर जरुर द्यावी. त्यांना जरा संयमाची लस टोचण्याची गरज आहे.

- Advertisement -

वेल्डिंगच्या स्पार्कमुळे आग -टोपे
वेल्डिंगच्या स्पार्कमुळे ही आग लागली आहे. तिथे इन्सुलिनचे भरपूर मटेरियल होते. ज्याला ज्वलनशीलता असते. त्यामुळे ती आग वाढत गेली. महापालिकेचे 5 टँकर आणि तीन आणखी वॉटर टँकर तात्काळ बोलावण्यात आले. संपूर्ण आग विझवण्यात आलेली आहे. आग विझवण्यासाठी दोन ते तीन तास लागलेत. आता पूर्णतः आग विझलेली आहे. सगळे आता नियंत्रणात आहे. संपूर्ण आग विझल्यानंतर लोकांनी आत जाऊन पाहिले. त्या ठिकाणी पाच मृतदेह आढळून आलेत, अशी माहितीसुद्धा राजेश टोपे यांनी दिली.

मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत रामाशंकर हरिजन, बिपीन सरोज, सुशीलकुमार पांडे आणि पुण्यातील महेंद्र इंगळे व प्रतिक पाष्टे यांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत सीरमचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी घोषित केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -