घरताज्या घडामोडीSerum Institute Fire: कोविशिल्ड लस पूर्णपणे सुरक्षित; पुणे पोलीस आयुक्तांची माहिती

Serum Institute Fire: कोविशिल्ड लस पूर्णपणे सुरक्षित; पुणे पोलीस आयुक्तांची माहिती

Subscribe

कोविशिल्ड लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आज आग लागली. मात्र, या आगीचा कोणाताही परिणाम कोविशिल्ड लसीवर झालेला नाही. कोविशिल्ड लस पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. शिवाय, आग लागलेल्या इमारतीत कुठलंही उत्पादन सुरु नव्हतं अशी देखील माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. तासाभरात आग विझण्याची शक्यता गुप्ता यांनी दिली. दरम्यान, इमारतीतून लोकांना बाहेर काढण्यात असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी माध्यमांशी संवाद साधत घटनेची संपूर्ण माहिती दिली. २.४५ वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्नीशमन दल घटनास्थळी पोहचलं आणि आग विझवण्याचं काम सुरु केलं. इमारतीतून सर्व लोकांना बाहेर काढण्यात आल्याची माहीती गुप्ता यांनी दिली. शिवाय, आग विझवण्यासाठी अजून १ तास लागेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. सीरम इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याला आग लागली. दरम्यान, या मजल्यांवर कोणतंही प्रोडक्शनचं काम सुरु नव्हतं. १ महिन्यानंतर प्रोडक्शन सुरु होणार होतं, अशी माहिती सीरमने आम्हाला दिली असं पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -