घरताज्या घडामोडीडिसेंबर पर्यंत लशी उपलब्ध होतील असे सांगणारे राजकारणी थापाडे - सायरस पूनावाला

डिसेंबर पर्यंत लशी उपलब्ध होतील असे सांगणारे राजकारणी थापाडे – सायरस पूनावाला

Subscribe

माझ्या मुलाने मला याबाबत तोंड उघडू नका असे सांगितले होते पण मी बोलणार असे म्हणत पूनावाला यांनी मोंदीवर हल्लाबोल केला.

कोव्हिशिल्ड ( Covishiel)  लस करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla ) यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. सध्या कोरोनाच्या कॉकटेल लसीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र या कॉकटेल लसी अयोग्य असल्याचे वक्तव्य सायरस पूनावाला यांनी केले आहे. त्याचप्रमाणे डिसेंबर पर्यंत महिन्याला १०-११ कोटी लसीचे डोस उपलब्ध होतील असे म्हणणारे राजकारणी थापाडे असल्याचे म्हणत त्यांनी चांगलीच टीका केली आहे. पुण्यात सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी लसींविषयी असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांच्यावर देखील जोरदार टीका केली. (Serum Institute head Cyrus Poonawalla Slams Modi Government over vaccine)

कोरोना लसीचा कॉकटेल डोस अयोग्य असल्याचे पूनावाला यांनी म्हटले. दोन लसींचे कॉकटेल करण्याची काही गरज नव्हती. कॉकटेल लसींचा परिणाम योग्य झाला नाही तर यात दोष कोणाचा असा प्रश्न निर्माण होऊन त्याविषयी आणखी  नवे प्रश्न उभे राहतीत,असे पूनावाला यांनी म्हटले. त्याचप्रमाणे कोव्हिशिल्ड लसीचे दोन डोस घेललेल्या नागरिकांनी सहा महिन्यांनी बूस्टर डोस देखील घेण्याचा सल्ला पूनावाला यांनी दिला आहे.

- Advertisement -

मुंबई पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पुणे मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या मधल्या काळात जास्त होती. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होणाऱ्या कोव्हिशिल्ड लसी आधी पुण्यात द्याव्यात अशी मागणी केली होती मात्र मोदी सरकारने त्यावर कोणतेही उत्तर दिले नसल्याचे पूनावाला यांनी म्हटले. माझ्या मुलाने मला याबाबत तोंड उघडू नका असे सांगितले होते पण मी बोलणार असे म्हणत पूनावाला यांनी मोंदीवर हल्लाबोल केला. परदेशात लसी पाठवायला बंदी घालून मोदी सरकारने फार वाईट केले. गेले अनेक वर्ष सीरम जगातील अनेक देशांना लसींचा पुरवठा करत आहे आणि आता त्यांना गरज असताना त्यांना लसींचा पुरवठा करता येत नाहीये.

सायरस पूनावाला कोण आहेत?

सायरस पूनावाला हे अदर पूनावाला यांचे वडिल आहेत. यासरस पूनावाला यांना व्हॅक्सिन किंग म्हणून ओळखले जाते तर त्यांचा मुलगा अदर पूनावाला यांना व्हॅक्सिन प्रिन्स असे म्हटले जाते. सायरस पूनावाला यांनी सुरुवातीला शर्यतीतल्या घोड्यांच्या व्यवसायासाठी देशातील पहिल्या स्टड फार्मची सुरुवात केली. उत्तम जातीचे घोडे ते मुंबईतील एका संस्थेला द्यायचे. त्या घोड्यांच्या रक्तापासून विषारी सापांवर औषध म्हणून लस तयार केली जायची. त्यावेळी त्यांना लस तयार करण्याची कल्पना सूचली आणि १९६६ साली त्यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. सीरममध्ये पोलिओ,टिटॅनस,हेपिटाईटिस बीवर यासारख्या आजारावर १.५ बिलियन लसीचे डोस तयार केले जातात.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोना काळात डायरिया आणि सेप्सिसमुळे सर्वाधिक बालकांचा मृत्यू, कुपोषणाचे प्रमाण घटले

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -