जीएसटी संकलन 1.41 लाख कोटींच्या पुढे, मे महिन्यात घट

Services and goods tax collection in May stood at Rs 1.41 lakh crore
मे महिन्यात सेवा आणि वस्तू कराचे संकलन 1.41 लाख कोटीच्या पुढे

मे महिन्यात वस्तू आणि सेवा कराचे संकलन 1.41 लाख कोटी रुपये झाले आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर चौथ्यांदा वसुलीचा आकडा 1.40 लाख कोटींच्या पुढे गेला आहे. मार्च 2022 पासून सतत जीएसटी संकलन जास्त राहिले आहे. मात्र एप्रिल 2022 च्या तुलनेत हे प्रमाण 16 टक्के कमी.

एप्रिल 2022 मध्ये जीएसटी संकलन प्रथमच 1.67 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आणि एख नवीन विक्रम प्रस्थापित झाला. मार्च महिन्यात 1.42 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या महिन्यात 1.40.885 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले.मात्र, एप्रिलच्या तुलनेत हे प्रमाण 26 हजार कोटींनी कमी आहे. एप्रिलमध्ये जीएसटीचे एकूण 1,67,540 कोटी रुपये सरकारकडे जामा झाले होते.

वर्षीच्या मे महिन्याच्या या वर्षी 44 टक्क्यांनी वाढ –

गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत या वर्षीच्या मे महिन्यात GST संकलनात 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मे 2021 मध्ये 1.02 लाख कोटींचे जीएसटी संकलन झाले आहे. 2021-22 आर्थिक वर्षात सरासरी जीएसटी संकलन 1.23 लाख कोटी रुपये होते. मे 2022 मध्ये 22.72 लाख कोटी रुपयांची एकूण 7.14 कोटी ई-वे बिले प्राप्त झाली आहेत. यामध्ये कोणतीही वाढ किंवा घट झाल्यास त्याचा परिणाम जीएसटी वसुलीवर होतो.

एप्रिल महिन्यापेक्षा मे महिन्याचे संकलन नेहमी कमीच –

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार मे महिन्यात संकलन एप्रिल महिन्यापेक्षा नेहमी कमी नोंदवले गेले आहे. एप्रिल हा आर्थिक वर्षाचा प्रारंभ असतो आणि मे कलेक्शन एप्रिलच्या रिटर्नशी जोडलेले असते. मे 2022 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1.40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे .