राणा दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर, सत्र न्यायालयाचा निर्णय

Sessions Court verdict grant bail navneet rana and Ravi Rana
राणा दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर, सत्र न्यायालयाचा निर्णय

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यां दोघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. राणा दाम्पत्य गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होते. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. तसेच त्यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. ११ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना काही अटींचे पालन करावे लागणार आहे.

राणा दाम्पत्याला जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राज्य सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. कलम १२४ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र राणा दाम्पत्याकडून कोर्टात जोरदार युक्तीवाद करण्यात आला होता. कोर्टात सोमवारी अंतिम निर्णय देण्यात येणार होता पंरतु कामकाजाचा वेळ संपल्यामुळे निर्णय राखून ठेवला होता. मंगळवारी कोर्टाचे कामकाज बंद होते यामुळे बुधवारी अंतिम निर्णयाचे वाचन करण्यात आले. राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने अटी-शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. तसेच माध्यमांसमोर प्रतिक्रिया देण्यात बंदी असेल. असे राणा दाम्पत्याच्या वकिलांनी सांगितले आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे त्यांची आजच जेलमधून सुटका होईल. रवी राणा नवी मुंबईतील तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. तर नवनीत राणा यांना अर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे. कोर्टाची निकालाची प्रत दोन्ही जेलमध्ये देण्यात येईल यानंतर कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर राणा दाम्पत्याला सोडण्यात येईल, अशी माहीती वकिलांनी दिली आहे.

राणा दाम्पत्याच्या घराबाहेर जल्लोषाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी घरासमोर गर्दी केली असून जय श्री राम च्या घोषणा देण्यात येत आहेत. ही जीत सत्तेची आहे. ही जीत संघर्षाची आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य आहे. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे.


हेही वाचा : Hanuman Chalisa Row : खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली; जे.जे रुग्णालयात केले दाखल