घरमहाराष्ट्रसिंधुदुर्गातील सावंतवाडी येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभे करा, मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आदेश

सिंधुदुर्गातील सावंतवाडी येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभे करा, मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आदेश

Subscribe

शातच कोकणातील जनतेसाठी एक महत्चाची गोष्ट आहे ती म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार आहे. ते हॉस्पिटल लवकरात लवकर तयार व्हावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेल्यानंतर कामांचा धडाकाच लावलेला आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील सर्व भागात जाऊन सर्वत्र विकास कामांची पाहणी करत आहेत. त्याचबरोबर जनतेला सर्व होई – सुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक कामात स्वतः लक्ष देत आहेत. अशातच कोकणातील जनतेसाठी एक महत्चाची गोष्ट आहे ती म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार आहे. ते हॉस्पिटल लवकरात लवकर तयार व्हावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत.

हे ही वाचा – मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे, वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत,…

- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तयार होणार आहे आणि त्यामुळेच जनतेची सोय होणार असून त्यांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे रुग्णांना गोवा येथे उपचार घेण्यासाठी जाण्याची आवश्यकता भासणार नाही. हे हॉस्पिटल लवकरात लवकर उभे राहण्यासाठी सर्व अडचणींवर सकारात्मक रितीने मार्ग काढावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

eknath shinde

- Advertisement -

हे ही वाचा – आमच्यावर टीका करणाऱ्यांवर किती केस आहेत विचारा, मुख्यमंत्री शिंदेंचा नेमका निशाणा कोणावर?

यावेळी आंबोली (चौकुळ) व गेळे येथील कबुलायतदार गावकर सदरातील जमिनीच्या वाटपाबाबत, मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्रासाठी आंबोली, ता. सावंतवाडी येथील जागा देण्याबाबत, आंबोली येथील एम.टी.डी.सी.च्या ताब्यातील पायाभूत सुविधा असलेली इमारत हॉस्पिस्टॅलिटी मॅनेजमेंट कोर्सेस चालविण्याकरिता मुंबई विद्यापीठाला मिळणेबाबत तसेच वेंगुर्ला येथे सिंधु स्वाध्यायसाठी मुंबई विद्यापीठाला जागा मिळणेबाबत चर्चा करण्यात आली.

सिंधुदुर्ग आणि नांदेड जिल्ह्यातील विविध प्रश्नांसदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यासह इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा – अरे वा! गणपतीत कोकणात जाण्यासाठी अतिरिक्त ३२ रेल्वेगाड्या, आजपासूनच बुकिंग सुरू

दरम्यान सावंतवाडी येथे हे हॉस्पिटल झाले तर अनेक नागरिकांचा गोव्यापर्यंत जाण्याचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचेल त्याप्रमाणे जवळच्याच अंतरावर नागरिकांना योग्य आणि दर्जेदार उपचार मिळू शकतात. ज्याचं फायदा नागरिकांना होईल.

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -