दुसरी ते दहावीसाठी सेतू अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचा पाया कच्चा असल्याने राज्य सरकारचा निर्णय

Setu course will be implemented in the state for students of 2nd to 10th standard

विद्यार्थ्यांचा शिक्षणातील पाया मजबूत व्हावा यासाठी नव्या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. मागील इयत्तेतील महत्वाच्या क्षमतांवर आधारित 30 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम शाळांमध्ये शिकवला जाणार आहे. कोरोनामुळे 2 वर्षांपासून शाळा बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केला जाणार आहे.

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2021 अहवालामध्ये भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र विषयांमध्ये विद्यार्थ्यांचा पाया कच्चा असल्याचे समोर आले आहे. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असल्याणे राज्य स्तरावर नव्या शैक्षणिक वर्षात सेतू अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र विषयासाठी सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम इयत्ता निहाय तयार करण्यात आला आहे. मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमतांवर हा अभ्यासक्रम आधारित आहे.
पूर्व चाचणी

राज्यभरातील शाळांसाठी (विदर्भातील शाळा सोडून)

17 व 18 जून 2022

सेतू अभ्यासक्रम

20 जून ते 23 जुलै 2022

उत्तर चाचणी

25 ते 26 जुलै 2022

विदर्भ भागातील शाळांसाठी कालावधी

पूर्वचाचणी 1आणि 2 जुलै 2022

तीस दिवसांचा सेतू अभ्यास

4 जुलै ते 6 ऑगस्ट 2022

उत्तर चाचणी

8 ते 10 ऑगस्ट 2022

सेतू अभ्यासक्रम 30 दिवसांचा आहे. हा अभ्यासक्रम शालेय कामकाजाच्या दिवसातच शिकवला जाणार आहे. या बद्दल शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सूचना दिल्या जाणार आहेत. सेतू अभ्यासक्रमात विद्यार्थी विषयनिहाय वर्कशीट प्रत्येक दिवशी सोडवतील या प्रकारे नियोजन करण्यात आले आहे.