पुण्यात कोरोनाचे २६८ नवे रुग्ण; बाधितांचा आकडा ८ हजार पार

पुण्यात कोरोनाचे २६८ नवे रुग्ण आढळले असून कोरोनाबाधितांचा आकडा ८ हजार ७७७ वर गेली आहे.

330 new corona patients found in kalyan dombivali
कोरोना विषाणू

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पुण्यात गेल्या २४ तासांत दिवसभरात नव्याने २६८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या ८ हजार ७७७ एवढी झाली आहे. तर दिवसभरात सात रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता अधिक वाढली आहे.

कोरोनामुळे ४१३ रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता ८ हजार ७७७ झाली आहे. तर पुण्यात आतापर्यंत ४१३ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच कोरोनावर उपचार घेणाऱ्या २०७ रुग्णांची आज पुन्हा टेस्ट करण्यात असून सुदैवाने या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या सर्व रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ५ हजार ७८२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची नोंद झाली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ८९ नवे रुग्ण

पुणे शहराबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोनाबाधितांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत पिंपरी-चिंचवडमध्ये ८९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजार १७ वर पोहचली आहे. दरम्यान, आज दहा जणांना घरी सोडण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिका आणि हद्दी बाहेरील एकूण १ हजार १७ जण करोनाबाधित असून यापैकी, ५१६ हद्दीतील तर हद्दीबाहेरील ७५ जणांना करोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. दरम्यान, आत्तापर्यंत ३७ जणांचा मृत्यू करोना विषाणूमुळे झाला आहे. तर आज ६० वर्षीय महिलेचा आणि ६२ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – औरंगाबादमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय; ९४ नव्या रुग्णांची वाढ