घरमहाराष्ट्रमराठा समाजाच्या सात जणांची मंत्रिमंडळात वर्णी, औरंगाबाद जिल्ह्यात तीन मंत्री

मराठा समाजाच्या सात जणांची मंत्रिमंडळात वर्णी, औरंगाबाद जिल्ह्यात तीन मंत्री

Subscribe

पश्चिम महाराष्ट्राला चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे आणि शंभूराज देसाई यांच्या रूपाने तीन मंत्री मिळाले आहेत. तर विदर्भातून भाजपने सुधीर मुनगंटीवार आणि शिंदे गटाने संजय राठोड अशा दोन मंत्र्यांना संधी दिली आहे.

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांमध्ये मराठा समाजातील सात मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय दलित, आदिवासी आणि मुस्लीम समाजाला प्रतिनिधित्व देऊन शिंदे यांनी मंत्रिमंडळात सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. (Seven minister from maratha community and three ministers from aurangabad in maharashtra cabinet)

हेही वाचा मिशन सुरत-गुवाहाटी फत्ते करणाऱ्या रवींद्र चव्हाणांना फडणवीसांकडून बक्षीस

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मराठा समाजाचे आहेत. आता चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे – पाटील, दादाजी भुसे, शंभूराज देसाई, तानाजी सावंत आणि संदीपान भुमरे हे मराठा चेहरे मंत्रिमंडळात सामील करण्यात आले आहेत. तर ओबीसी समाजाच्या तीन नेत्यांनाही शपथ देण्यात आली आहे. आदिवासी समाजातील नेते डॉ. विजयकुमार गावीत यांना शपथ देण्यात आल्याने ते आदिवासी विकास खात्याचे म तर अनुसूचित जातीतील सुरेश खाडे यांच्याकडे सामाजिक न्याय खात्याची धुरा जाणार आहे. गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील या जळगाव जिल्ह्यातील दोन्ही गुर्जर समाजाच्या नेत्यांनाही संधी देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात सर्वाधिक मंत्री औरंगाबादचे

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार त्यांच्यासोबत गेले. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार हे तर मंत्रीपद असतानाही शिंदे यांच्यासोबत गेले. आता त्यांना पुन्हा मंत्री करण्यात आले आहे. अब्दुल सत्तार आधी राज्यमंत्री होते. आता त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची बक्षिसी देण्यात आली आहे. भाजपनेही औरंगाबाद महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पहिल्या टप्प्यात अतुल सावे यांना संधी दिली आहे. याशिवाय शिंदे गटाने मराठवाड्यातील तानाजी सावंत यांना मंत्रीपदी संधी दिली आहे.

हेही वाचा – पक्षातील एकही महिला मंत्रिपदासाठी लायक नाही का? पेडणेकरांचा खोचक सवाल

कोकणातील तीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. उदय सामंत (रत्नागिरी) दीपक केसरकर (सिंधुदुर्ग) आणि रवींद्र चव्हाण (ठाणे जिल्हा, डोंबिवली) यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचीही नावे चर्चेत होती. मात्र पहिल्या विस्तारात त्यांना संधी मिळाली नाही. मुंबईतही मंगलप्रभात लोढा यांच्या रूपाने एकमेव मंत्रिपद मिळाले आहे.

हेही वाचा – संजय राठोडांवर भाजपा नेत्यांनी केली होती टीका; सोमय्या, फडणवीसांचा जुना व्हिडीओ व्हायरल

पश्चिम महाराष्ट्राला चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे आणि शंभूराज देसाई यांच्या रूपाने तीन मंत्री मिळाले आहेत. तर विदर्भातून भाजपने सुधीर मुनगंटीवार आणि शिंदे गटाने संजय राठोड अशा दोन मंत्र्यांना संधी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -