घरCORONA UPDATEडोंबिवली पाठोपाठ पुण्यातही आढळले ओमिक्रॉनचा रुग्ण, राज्यातील रुग्णांची संख्या ८ वर

डोंबिवली पाठोपाठ पुण्यातही आढळले ओमिक्रॉनचा रुग्ण, राज्यातील रुग्णांची संख्या ८ वर

Subscribe

जगभरात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भारतातही या विषाणूने आत्ता शिरकाव केला आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढतच आहे. यात आत्ता आणखी सात रुग्णांची भर पडली आहे. डोंबिवलीपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एका व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे आढळलेय. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्य़ा ८ वर पोहचली आहे.

२४ नोव्हेंबर रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातूनआलेल्या ४४ महिला तिचा भाऊ, त्यांच्यासोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरातील तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली अशा एकूण सहा जणांना ओमिक्रॉन विषाणूची लागण झाल्याची माहिती राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज दिली आहे. या सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांना पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. यात सहा रुग्णांपैकी तीन जण १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

- Advertisement -

तसेच पुण्यातील ४७ वर्षीय पुरुषाला देखील ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरटरीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. हा व्यक्ती काही दिवसांपूर्वी फिनलँड देशातून आला आहे. २९ तारखेला त्या व्यक्तीला ताप आला होता. त्यामुळे त्या व्यक्तीने कोरोनाची चाचणी केली. यामध्ये तो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. विशेष म्हणजे या व्यक्तीने कोव्हिशील्ड लस घेतली आहे. सध्या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातीय ओमिक्रॉन विषाणूबाधित रुग्णांची संख्या ८ वर पोहचली आहे.  कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने आत्ता पुण्यातही शिरकाव केल्याने महाराष्ट्राच्या चिंतेत भर पडली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -