Homeताज्या घडामोडीNagpur Case : नागपूरमध्ये ऑनलाइन गेम खेळतान 17 वर्षीय तरुणीची आत्महत्या

Nagpur Case : नागपूरमध्ये ऑनलाइन गेम खेळतान 17 वर्षीय तरुणीची आत्महत्या

Subscribe

मागील काही वर्षांपूर्वी ब्लू वेल हा ऑनलाइन गेम खूप प्रसिद्ध झाला होता. टास्क पूर्ण करणे हे या गेमचे वैशिष्ट्य होते. पण ब्लू वेल हा जरी टास्क पूर्ण करण्याचा गेम असला तरी, अनेक तुरुणांनी या गेमच्या विळख्यात अडकून आत्महत्या केल्या आहेत.

नागपूर : मागील काही वर्षांपूर्वी ब्लू वेल हा ऑनलाइन गेम खूप प्रसिद्ध झाला होता. टास्क पूर्ण करणे हे या गेमचे वैशिष्ट्य होते. पण ब्लू वेल हा जरी टास्क पूर्ण करण्याचा गेम असला तरी, अनेक तुरुणांनी या गेमच्या विळख्यात अडकून आत्महत्या केल्या आहेत. या घटना ताज्या असतानाच आता नागपूरमध्ये एका 17 वर्षीय मुलीने ऑनलाइन गेम खेळण्याच्या नादात स्वत:ला संपवलं आहे. हाताची नस कापत आणि गळ्यावर जखम करून या मुलीने आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे आत्महत्येनंतर एक चिठ्ठी त्या मुलीजवळ सापडली. त्यामुळे पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असल्याची माहिती मिळते. (seventeen year old girl suicide while playing online game in nagpur)

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीने ऑनलाइम गेम खेळताना आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. सोमवार (27 जानेवारी) रोजी सकाळी ही घटना घडली. रात्री ही मुलगी गेम खेळत होती, सकाळी आई-वडिलांच्या खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत सापडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरूवात केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीने आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण मुलीजवळ एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये तिने लिहिलेल्या मजकुरावरून पोलीस तपास करत आहेत. ऑनलाइन गेमिंगच्या टास्कमुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. तसेच, पीडित मुलगी उत्तम लिखाण करायची आणि विविध विषयांवर तिच्या भावना व्यक्त करायची, असेही तपासात उघड झाले.

दरम्यान, आपल्या मुलीला अशा अवस्थेत पाहून आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली होती. याशिवाय, ऑनलाइन गेमिंगमुळे उद्भवणारे मानसिक दबाव आणि गेमच्या लेव्हलमध्ये गुरफटून जाणाऱ्या तरुणाईचे भयावह वास्तव पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून, पालकांमध्ये या प्रकारामुळे चिंता वाढली आहे.


हेही वाचा – GBS : पुण्यानंतर कोल्हापुरात GBSचा धोका वाढला; दोन जण पॉझिटिव्ह