Thursday, March 4, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सातवा आयोग; नाशिक महापालिका कर्मचार्‍यांनी दिले भुजबळांना श्रेय

सातवा आयोग; नाशिक महापालिका कर्मचार्‍यांनी दिले भुजबळांना श्रेय

पुष्पगुच्छ आणि पेढे देऊन केला सत्कार; २०१६ पासून रखडला होता प्रश्न

Related Story

- Advertisement -

नाशिक महापालिकेत ५००० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र त्यांना ७ वा वेतन अयोग लागू करण्यात आला नव्हता. हा प्रश्न २०१६ पासून प्रलंबित होता याबाबत कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने कर्मचार्‍यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर हा प्रश्न मांडला होता. भुजबळ यांनी थेट नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक यांच्याशी संवाद साधून हा प्रश्न तत्काळ व कर्मचार्‍यांचे कुठलेही आर्थिक नुकसान होऊ न देता निकाली काढावा बाबत आदेश दिले होते. त्यानंतर तत्काळ मनपा कर्मचार्‍यांना पिंपरी चिंचवड मनपाच्या धर्तीवर ७ वा वेतन आयोग लागू करण्यात आला. इतक्या कमी कालावधीत आणि वेगाने हा प्रश्न निकाली काढल्याबद्दल सर्व कर्मचार्‍यांच्या वतीने भुजबळ यांचे ऋण व्यक्त केलेे. सर्व संघटनानी एकत्र येऊन नाशिक येथील कार्यालयात पालकमंत्र्यांना आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना पुष्पगुछ आणि पेढे वाटप करून अभिनंदन केले. यावेळी नाशिक महापालिकेचे समता कर्मचारी संघटनेचे योगेश कमोद, राजेश दुल्ला,रमेश उदावंत आदी कर्मचारी उपस्थित होते.

 

- Advertisement -