Sex For Oxygen प्रकरण, राष्ट्रीय महिला आयोगही हादरला, पोलिसांना हस्तक्षेपाची विनंती

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहित या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी

Sex For Oxygen case, National Commission for Women also scared, requesting police to intervene
Sex For Oxygen प्रकरण, राष्ट्रीय महिला आयोगही हादरला, पोलिसांना हस्तक्षेपाची विनंती

दिल्लीमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे दिल्लीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आरोगय यंत्रणेवर ताण आला आहे. तसेच कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला आहे. दिल्लीत रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनच्या शोधात मानसिक त्रासाला समोरे जावे लागत आहे. एका तरुणीला ऑक्सिजनच्या सिलेंडरच्या बदल्यात शरीस सुखाची मागणी करण्यात आली आहे. या तरुणीच्या वडिलांना ऑक्सजनची गरज होती. तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली होती. परंतु आता महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

दिल्लीमध्ये कोरोनाबाधितांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक प्रयत्न केल्यानंतर ऑक्सिजन सिलेंडर मिळत आहे. या परिस्थितीचा फायदा अनेकजन घेत आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने ११ मे रोजी ट्विट करत साऱ्यांचे लक्ष वेधले होते. या वापरकर्त्याने ट्विट केले होते की, माझ्या मित्राच्या बहिणीला तिच्या वडिलांकरिता ऑक्सिजन सिलेंडरची गरज होती. तिच्या शेजारच्या कॉलनीमध्ये असलेल्या एका व्यक्तीकडे ऑक्सिजन सिलेंडर बाबत विचारणा केली असता त्या व्यक्तीने ऑक्सिजनच्या बदल्यात शरीर संबंध ठेवण्याची अट घातली. अशा आशयाचे ट्विट या युजरने केल्यानंतर ते तुफान व्हायरल झाले आहे. यावर राष्ट्रीय महिला आयोगने(NCW) दखल घेत कारवाई सुरु केली.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहित या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपीविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. कोरोना साथीच्या संकटामध्ये येणाऱ्या तक्रारींमुळे महिला राष्ट्रीय आयोगही चक्रावले आहे. म्हणून आपण या प्रकरणात हस्तक्षेप करुन मदतीनुसार चौकशी करणे आवश्यक आहे. भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या अंतर्गत आरोपीविरोधात कारवाई करण्यात यावी. असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुखांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

दिल्ली हायकोर्टाचे ऑक्सिजन पुरवठ्यावरुन ताशेरे

दिल्लीतील कोरोना परिस्थिती चिंताजनक झाल्यानंतर ऑक्सिजन पुरवठा कमी झाला होता. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने ऑक्सिजन पुरवठ्यावरुन मॅरेथॉन सुनावणी घेतली होती. या सुनावणीमध्ये दिल्लीच्या आप सरकारला कोरोना परिस्थितीत लढण्यासाठी उपाय योजना सांगितल्या होत्या. ऑक्सिजन पुरवठा सुरळित करण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश दिले होते. तसेच कोरोनाविरोधा लागणाऱ्या औषधांच्या पुरवठ्यावरुनही हायकोर्टाने दखल घेतली होती. केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे दिल्लीमध्ये ऑक्सिजन आणि कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे.