घरमहाराष्ट्रगेली अडीच वर्षे राज्यमंत्री फक्त नावालाच, काहीच अधिकार नव्हते, शंभूराज देसाईंचा आरोप

गेली अडीच वर्षे राज्यमंत्री फक्त नावालाच, काहीच अधिकार नव्हते, शंभूराज देसाईंचा आरोप

Subscribe

बंडखोर शिंदे गटातील राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपली रोखठोक भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी गेली अडीच वर्ष आम्ही राज्यमंत्री फक्त नावालाच होतो. अडीच वर्षात कॅबिनेट मंत्री – राज्यमंत्र्यांचे अधिकार वाटप देखील झालेले नाही, आसा आरोप शंभूराज देसाई यांनी केला आहे.

राज्यमंत्री शंभूराज देसाईंचे अजित पवारांवर आरोप –

- Advertisement -

राज्यमंत्री असून देखील आम्हाला आमच्या मतदारसंघात फंड मिळत नव्हता. याउलट आम्ही पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराना उपमुख्यमंत्री अजित पवार ताकद देत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे यासंदर्भांत वारंवार तक्रारी करूनही कधीही कारवाई झाली नाही, अशी ही तक्रार शंभूराज देसाई यांनी केली आहे.

तानाजी मालुसरेंच्या समाधी स्थळसाठी निधी न मिळाल्याचा आरोप –

- Advertisement -

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरड येथील समाधी स्थळ परिसराचा विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी तेथील कार्यक्रमात केली होती. अर्थ आणि वित्त राज्य मंत्री नात्याने या निर्णयाची मी विधानपरिषदेत घोषणा केली होती. यासाठी 5 कोटी रुपये निधी तरतूद करण्याची शिफारस अर्थराज्य मंत्री या नात्याने मी उपमुख्यमंत्री – अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.मात्र वारंवार पाठपुरावा करून देखील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळ विकासासाठी 5 कोटी रुपये देखील मंजूर करण्यात आले नाहीत, आसा आरोप शंभूराज देसाई यांनी केला आहे.

शिवसैनिकांना भूमिता  समजून घेण्याचे आवाहन –

आम्हा राज्यमंत्र्याची ही अवस्था असेल तर आमदारांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल याचा आपण विचार करा.म्हणूनच एक स्पष्ट भूमिका घेण्याची विनंती केली आम्ही एकनाथजी शिंदे यांच्यासोबत येण्याचा हा निर्णय घेतला. आमची ही भूमिका शिवसेनेच्या हिताचीच असून सर्वसामान्य शिवसैनिकांनी देखील ती समजून घ्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे, असे शंभूराज देसाई यांनी म्हंटले होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -