घरताज्या घडामोडीठाकरी भाषा फक्त शिवसेनाप्रमुखांनाच शोभते, शहाजीबापू पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला

ठाकरी भाषा फक्त शिवसेनाप्रमुखांनाच शोभते, शहाजीबापू पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला

Subscribe

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज देखील आदित्य ठाकरेंनी कोकण दौरा करत शिंदे गटातील बंडखोरांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, ठाकरी भाषा ही फक्त शिवसेनाप्रमुख यांनाच शोभत होती. आदित्य ठाकरे यांच्यासारख्या लहान पोराने ही भाषा वापरू नये, असा टोला शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर लगावला आहे.

आदित्य ठाकरे बंडखोरी केलेल्या आमदारांना गद्दार संबोधत असल्याने संतापलेल्या शहाजीबापू पाटील यांनी आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्याचे नातू म्हणून महाराष्ट्रभर फिरत आहेत. ते लोकमतातले नेतृत्व म्हणून फिरत नाहीत, त्यांच्या नावामागचे ठाकरे नाव काढले तर ५० माणसांची सभा देखील ते घेऊ शकणार नाही, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.

- Advertisement -

आम्ही ठाकरे कुटुंबाचा आदर करतो, मातोश्रीबाबत आम्हाला प्रेम आहे म्हणून आम्ही ऐकून घेत आहोत पण आता वेडेवाकडे बोलणे बंद नाही झाले तर आम्हालाही उलट्या बाजूने उत्तर द्यावे लागेल, असा इशारा पाटलांनी दिला आहे.

ठाकरी भाषा फक्त बाळासाहेब ठाकरे यांनाच शोभून दिसते. जे साहेबांच्या क्लिप काढून त्यांच्यासारखी भाषा वापरायची आणि अॅक्शन करायच्या हे शोभून दिसत नाही. तुम्ही एखादा ठाकरी शब्द वापरला तर तो जिव्हारी लागणार नाही. मात्र आदित्य ठाकरे यांच्यासारख्या लहान पोराने ही भाषा वापराने योग्य नाही, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा; अखेर राज्यपालांचा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -