घरमहाराष्ट्रSanjay Raut : हा तर 5 लिटर रॉकेल, 2 काड्यापेट्या घेऊन बसलेला...

Sanjay Raut : हा तर 5 लिटर रॉकेल, 2 काड्यापेट्या घेऊन बसलेला माणूस; शहाजीबापू कोणाबद्दल म्हणाले?

Subscribe

सोलापूर : शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. पाच लिटर रॉकेल आणि दोन काडेपेट्या घेऊन सकाळी नारळाच्या झाडाखाली बसणार माणूस म्हणजे संजय राऊत असे शहाजीबापू पाटील म्हणाले आहेत. एकेकाळच्या आपल्याच सहकाऱ्यावर शहाजीबापू यांनी ही टीका केली आहे. शहाजीबापू पाटील यांच्या टीकेला आता संजय राऊत काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

हेही वाचा – Sharad Pawar : ‘…म्हणून आजवर रायगडावर यायला वेळ मिळाला नाही’; भाजपचा पवारांवर हल्लाबोल

- Advertisement -

नवीन चिन्हाला मत मिळेल का, हा प्रश्न

शहाजीबापू पाटील यांनी शरद पवार गटाला मिळालेल्या नवीन तुतारी या चिन्हासंदर्भात देखील प्रतिक्रिया दिली. हे नव्याने मिळालेलं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचेल पण त्या चिन्हाला लोक मतदान करतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे. चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणे अवघड नसल्याचे शहाजीबापू पाटील म्हणाले. शहाजीबापू पाटील यांनी माढा लोकसभेसंदर्भात देखील वक्तव्य केलं. ती जागा भाजपची आहे. त्यामुळं आम्ही त्या जागेची मागणी करणार नाही. तिथं मी शिवसेनेचा एकटाच आमदार आहे. तिथं आम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पाठिंबा देणार असल्याचे पाटील म्हणाले.

हेही वाचा – Maharashtra Politics : राज ठाकरेंचा ईव्हीएमला विरोध; फडणवीस म्हणाले, त्यांना पुन्हा पटेल

- Advertisement -

दरम्यान, गणपतराव देशमुख यांचे नातू माढा लोकसभा लढणार अशीही चर्चा सुरु आहे. याबाबत शहाजीबापू पाटील म्हणाले की, कॉलेजची पोरं कशाला खासदारकी लढवतील. त्यांना आमदारकी लढू द्या असे पाटील म्हणाले. याव्यतिरिक्त लोकसभा, लोकसभेचे जागावाटप याबाबत काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. याबाबत माझा अभ्यास नाही, असे सांगत त्यांनी बोलणे टाळले.

हेही वाचा – Hyderabad Crime : ऐकावं ते नवलच! लग्नास नकार दिला म्हणून ‘तिने’ केले टीव्ही अँकरचे अपहरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -